लग्नापूर्वी पूजा सावंत भूषण-प्रार्थनासोबत या ठिकाणी करतेय व्हॅकेशन एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 02:06 PM2023-12-26T14:06:10+5:302023-12-26T14:06:31+5:30

अभिनेत्री पूजा सावंत सध्या (Pooja Sawant) प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने साखरपुडा झाल्याची खुशखबर दिली आणि सर्वांना सुखद धक्का दिला. ती सिद्धेश चव्हाणसोबत २०२४ मध्ये लग्नगाठ बांधणार आहे.

Before the wedding Pooja Sawant Bhushan is enjoying the vacation at this place with prayer | लग्नापूर्वी पूजा सावंत भूषण-प्रार्थनासोबत या ठिकाणी करतेय व्हॅकेशन एन्जॉय

लग्नापूर्वी पूजा सावंत भूषण-प्रार्थनासोबत या ठिकाणी करतेय व्हॅकेशन एन्जॉय

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत सध्या (Pooja Sawant) प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने साखरपुडा झाल्याची खुशखबर दिली आणि सर्वांना सुखद धक्का दिला. ती सिद्धेश चव्हाणसोबत आगामी वर्षात लग्नगाठ बांधणार आहे. दरम्यान आता लग्नापूर्वी ती मराठी कलाविश्वातील तिचे मित्र मंडळी भूषण प्रधान, प्रार्थना बेहरेसोबत गोव्यात व्हॅकेशनसाठी गेली आहे.

पूजा सावंत नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी गोव्यात पोहचली आहे. तिच्यासोबत तिची बहिण रुचिरा, भाऊ श्रेयस, प्रार्थना बेहरे आणि तिचा नवरा अभिषेक जावकर, भूषण प्रधान गेले आहेत. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. पूजाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, गोव्यातील ख्रिसमसची सकाळ. यापेक्षा सुंदर काय असू शकतं. तर तिने इंस्टाग्राम स्टोरीवर अजुना बीच फिरतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

कोण आहे पूजाचा होणारा नवरा? 
पूजाचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण डिझ्नी कंपनीत असल्याच्या चर्चा आहेत. तसेच तो विदेशात राहतो या चर्चांनाही उधाण आले आहे. त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल अद्याप काहीही समजू शकलेलं नाही.

पूजाने सांगितला लग्नाचा प्लॅन
पूजा सावंत पुढील वर्षी म्हणजेच २०२४मध्ये लग्नगाठ बांधणार आहे. तिने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाचा प्लॅन सांगितला. ती म्हणाली, माझे लग्नाबद्दल खूप प्लान्स आहेत. कारण, लहानपणापासूनच लग्न करायचे ही माझी मनापासून इच्छा होती. त्यात मला ‘पर्पल वेडिंग’चं खूप आकर्षण आहे. मात्र आपल्या मराठी लोकांमध्ये लग्न लागताना पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसावी लागते. मला मनातून जांभळ्या रंगाची नऊवारी नेसण्याची खूप इच्छा आहे पण, घरच्यांनी आधीच पिवळ्या साडीबद्दल सांगितले आहे. जांभळ्या रंगाच्या साडीसाठी मला घरून कोणीच परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मी आपल्या परंपरा, रितीरिवाज सांभाळून लग्नाचे प्लान्स करणार आहे. साडीशिवाय माझ्या आई-बाबांनी मला कोणत्याच गोष्टीचे बंधन घातलेले नाही. 


 

Web Title: Before the wedding Pooja Sawant Bhushan is enjoying the vacation at this place with prayer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.