Best Of 2018 : या मराठी गाण्यांना मिळाली रसिकांची पसंती, जरुर ऐका ही गाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 06:29 PM2018-12-24T18:29:49+5:302018-12-24T18:31:44+5:30

2018 मध्ये एकाहून एक सरस गाणी रसिकांना ऐकायला मिळाली. जाणून घेऊया कोणत्या गाण्यांनी रसिकांचे जिंकले मन

Best Of 2018: Best Marathi songs of 2018 | Best Of 2018 : या मराठी गाण्यांना मिळाली रसिकांची पसंती, जरुर ऐका ही गाणी

Best Of 2018 : या मराठी गाण्यांना मिळाली रसिकांची पसंती, जरुर ऐका ही गाणी

googlenewsNext
ठळक मुद्देशिववा आमचा मल्हारी हे फर्जंदमधील गाणे आज सगळ्यांच्या ओठावर रुळले आहे.

2018 या वर्षांत अनेक चांगली गाणी रसिकांच्या भेटीस आली. या गाण्यांनी रसिकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली.

देवाक काळजी रे
रेडू या चित्रपटातील देवाक काळजी रे हे गाणे रसिकांना प्रचंड आवडले होते. हे गाणे अजय-अतुल जोडीतील अजय गोगावलेने गायले होते. या गाण्याचे बोल मनाला स्पर्श करून जातात.

जाऊ दे ना व

नाळ या चित्रपटातील जाऊ दे न व हे गाणे तर प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. या गाण्यातील निरागसता प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे गाणे एका चिमुरड्याने गायले आहे. या गाण्याचा गायक जयस कुमार असून सारेगमप लिटिल चॅम्प या कार्यक्रमात तो २०१५ ला झळकला होता. 

माझी पंढरीची माय
माऊली या चित्रपटातील माझी पंढरीची माय हे गाणे अजय गोगावलेने गायले असून हे गाणे रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.  

आली ठूमकत नार 
आली ठुमकत नार हे जुने गाणे रसिकांना पुन्हा मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपटात पाहायला मिळाले. हे गाणे जुने असले तरी एका वेगळ्या अंदाजात ते प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या गाण्याचे संगीत, बोल रसिकांना चांगलेच भावत आहे. 

तुला पाहाता
मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपटातील तुला पाहता हे रोमँटिक साँग रसिकांना प्रचंड आवडले असून स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यावर हे चित्रीत करण्यात आले आहे.

कुणी येणार गं
मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपटातील गौरी म्हणजेच मुक्ता बर्वेच्या डोहाळ जेवणाचे गाणे रसिकांचे मन जिंकत आहे. 

शिववा आमचा मल्हारी 
शिववा आमचा मल्हारी हे फर्जंदमधील गाणे आज सगळ्यांच्या ओठावर रुळले आहे. या गीताचे लेखन दिग्पाल लांजेकरने केले असून हे गाणे या चित्रपटातील सर्व कलाकारांनी मिळून गायले आहे. 

होऊ द्या ना
बकेट लिस्ट मधील श्रेया घोषाल, साधना सरगम आणि शान यांनी गायलेले होऊ द्या ना हे गाणे नक्कीच ताल धरायला लावते. 

Web Title: Best Of 2018: Best Marathi songs of 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.