भद्रकाली प्रॉडक्शनला ३४ वर्ष पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2016 04:42 AM2016-07-29T04:42:28+5:302016-07-29T10:12:28+5:30

मायबाप रसिक प्रेक्षकांना अप्रतिम नाटकांची मेजवाणी देणा-या भद्रकाली प्रॉडक्शनला ३४ वर्ष पूर्ण झाली.  मच्छिंद्र कांबळी यांनी भद्रकाली प्रॉडक्शनची स्थापना ...

Bhadrakali Productions completed 34 years | भद्रकाली प्रॉडक्शनला ३४ वर्ष पूर्ण

भद्रकाली प्रॉडक्शनला ३४ वर्ष पूर्ण

googlenewsNext

tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">मायबाप रसिक प्रेक्षकांना अप्रतिम नाटकांची मेजवाणी देणा-या भद्रकाली प्रॉडक्शनला ३४ वर्ष पूर्ण झाली. 

मच्छिंद्र कांबळी यांनी भद्रकाली प्रॉडक्शनची स्थापना केली आणि त्यांच्यानंतर नवनाथ प्रसाद कांबळी याची संपूर्ण जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेत. 

पप्पा सांगा कुणाचे, रातराणी, येवा कोंकण आपलाच आसा, वस्त्रहरण, संशय कल्लोळ, सुखाशी भांडतो आम्ही, हा शेखर खोसला कोण आहे, मास्तर ब्लास्टर, गेला उडत आदी नाटकांची निर्मिती या प्रॉडक्शनच्या अंतर्गत केली आहे.

काल दिनांक २७ जुलै २०१६ रोजी भद्रकाली प्रॉडक्शनचा ३४वा वर्धापन दिन विले पार्ले येथील दीनानाथ नाट्यगृह येथे संपन्न झाला.

यावेळी भद्रकाली प्रॉडक्शन आणि मास्तर ब्लास्टर नाटकाची संपूर्ण टिम, प्रदीप कबरे, अनंत पणशीकर, अशोक शिंदे, किशोर प्रधान, देवेंद्र पेम आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Bhadrakali Productions completed 34 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.