ही मराठी अभिनेत्री दिसली चक्क शेतात वावरताना, सोशल मीडियावर फोटोची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 14:05 IST2019-12-09T13:54:17+5:302019-12-09T14:05:08+5:30
इन्स्टाग्रामवरच्या सेक्सी व बोल्ड फोटोंना घेऊन ती नेहमीच चर्चेत असते.

ही मराठी अभिनेत्री दिसली चक्क शेतात वावरताना, सोशल मीडियावर फोटोची चर्चा
अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. भाग्यश्री नेहमीच तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी चक्क तिने शेतातला फोटो शेअर केला आहे. भाग्यश्रीचा शेतातला हा फोटो तिच्या फॅन्सना चांगलाच आवडला आहे. तिच्या फोटोवर फॅन्सनी शेती शिवाय मजा नाही, वा पाटलीन बाई एकदमच कडककडकककककक अशा वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.
भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे. भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.
भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता.