भाग्यश्री मोटे दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 21:00 IST2019-01-04T21:00:00+5:302019-01-04T21:00:00+5:30
काही दिवसांपूर्वी भाग्यश्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे समजले होते. त्यानंतर आता ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे.

भाग्यश्री मोटे दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज
मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सिनेमागृहात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कोल्हापूर, सांगली, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, हिंगोली, नाशिक, या शहरात चित्रपटाचे शो हाऊसफुल जात आहे. काही दिवसांपूर्वी भाग्यश्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे समजले होते. त्यानंतर आता ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. ही माहिती खुद्द तिने सोशल मीडियावर दिली आहे.
भाग्यश्री लवकरच तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. हा कॉमेडी हॉरर सिनेमा असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारीखेची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. 'चिकती गदीलो चिताकोटुडू' चित्रपटात मित्रमंडळी फिरण्यासाठी एका ठिकाणी जातात. ते ज्या ठिकाणी वास्तव्यास थांबतात. त्या ठिकाणी भूत असतो आणि मग त्यांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, यावर आधारीत या चित्रपटाची कथा आहे.
भाग्यश्री मोटेने सोशल मीडियावर 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटाचा पोस्टर व टीझर शेअर करून लिहिले की, माझ्या नवीन वर्षाची सुरूवात या बातमीने झाली. माझे तेलगूमध्ये पदार्पण असलेला चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू'चा टीझर प्रदर्शित झाला आहे.
भाग्यश्री मोटे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार असून, हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे हे वर्ष भाग्यश्रीसाठी खास ठरणार असे दिसते आहे.