बोल्डनेसमध्ये ही मराठी अभिनेत्री देते भल्याभल्यांना टक्कर, पुन्हा शेअर केला हॉट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 12:49 IST2020-05-01T12:30:04+5:302020-05-01T12:49:19+5:30
'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले.

बोल्डनेसमध्ये ही मराठी अभिनेत्री देते भल्याभल्यांना टक्कर, पुन्हा शेअर केला हॉट फोटो
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. भाग्यश्रीने तिचा एक बोल्ड अँड हॉट फोटो शेअर केला आहे. फोटोतील तिच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. तिच्या या फोटोवर फॅन्सनी फिदा झाले आहेत. लाईक्स आणि कमेंट्स त्यांनी या फोटोवर केल्या आहेत.
भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.
भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता. भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे.
भाग्यश्री मोटे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत.