'बाबा आपण...', लेकीच्या 'त्या' एका वाक्यानं भरत जाधव रात्रभर झोपलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 01:15 PM2023-05-05T13:15:40+5:302023-05-05T13:16:15+5:30

Bharat Jadhav : नाटकाच्या प्रयोगावरून परतत असताना बाकीचे कलाकार बसमध्ये झोपलेले होते. पण भरतला त्या दिवशी झोप येत नव्हती. वाचा भरत जाधवच्या संघर्षाच्या काळातील हा किस्सा...

Bharat Jadhav did not sleep for the whole night, filled with one sentence of 'that' from daughter, 'Dad, you...' | 'बाबा आपण...', लेकीच्या 'त्या' एका वाक्यानं भरत जाधव रात्रभर झोपलाच नाही

'बाबा आपण...', लेकीच्या 'त्या' एका वाक्यानं भरत जाधव रात्रभर झोपलाच नाही

googlenewsNext

अभिनेता भरत जाधवने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. नाटकापासून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू करणाऱ्या भरत जाधवला अंकुश चौधरी आणि केदार सारखे मित्र लाभले. क्रांती रेडकरसोबत त्याने नाटक आणि चित्रपटात काम केले. भरतच्या स्ट्रगलच्या काळातील हे मित्र त्याचे साक्षीदार होते. एकदा एका कार्यक्रमात भरत जाधवच्या स्ट्रगलबद्दल बोलताना क्रांतीने त्या प्रसंगाची आठवण करून देताच भरत भावुक झालेला पाहायला मिळाला. 

नाटकाच्या प्रयोगावरून परतत असताना बाकीचे कलाकार बसमध्ये झोपलेले होते. पण भरतला त्या दिवशी झोप येत नव्हती, तो काहीतरी विचार करत असेल असे क्रांतीला वाटले. क्रांतीलाही झोप येत नव्हती. त्यामुळे तिने भरतला बोलते करण्याचा प्रयत्न केला. भरत जाधवचे वडील हे मुंबईत टॅक्सी चालवत होते. तो त्यावेळी नाटकातून आपला जम बसवू पाहत होता. त्यामुळे त्याच्या घरची परिस्थिती खूप बेताचीच होती. मुलांनी आपल्याकडे हट्ट केल्यावर त्याला पाहिजे ते मिळवून देणं या गोष्टी फार दुरच्या असायच्या. 

लेकीच्या एका वाक्यानं मनात दिवसभर झाली कालवाकालव

भरत जाधवची लेक सुरभी त्यावेळी खूप लहान होती. ती त्याच्याकडे काही ना काही तरी वस्तू मागायची. तेव्हा भरत दरवेळी तिला ‘आपण हे उद्या घेऊ’ असे म्हणून तिची समजूत काढायचा. अनेकदा असे घडल्यानंतर एक दिवस सुरभी स्वतःहून म्हणाली, बाबा आपण हे उद्या घेऊ. सुरभीच्या या एका वाक्याने भरतच्या मनात दिवसभर कालवाकालव झाली. आपली मुलगी आपली परिस्थिती पाहून अशी म्हणाली एवढी तिला समज आलेली पाहून भरतला त्या रात्री झोपच आली नव्हती.

भरतचा सुपरस्टार होण्याचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता

हे ऐकल्यावर क्रांती त्याला म्हणाली होती की, भरत बघ एक ना एक दिवस आपला हा स्ट्रगल संपलेला असेल. तू मोठा स्टार बनशील आपल्याकडे खूप पैसे येतील. भरतचा सुपरस्टार होण्याचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. त्यानंतर मात्र अथकपरिश्रमातून भरतचे नशीब पालटले. नाटक, चित्रपट असे एकापाठोपाठ एक कामं मिळत गेली. सुपरस्टार बनण्यापर्यंत त्याने मजल मारली. एवढेच नाही तर मराठी इंडस्ट्रीत पहिली व्हॅनिटी व्हॅन घेणारा कलाकार म्हणून त्याने आपल्या नावावर शिक्का मारला. आपले पाय जमिनीवरच असावेत म्हणून त्या व्हॅनिटी व्हॅन मधल्या आरश्याच्या कपाटाच्या आत त्याने टॅक्सीचा फोटो लावला होता. जेणेकरून कपडे उतरवल्यावर आपण आपले पूर्वीचे दिवस विसरू नये.

Web Title: Bharat Jadhav did not sleep for the whole night, filled with one sentence of 'that' from daughter, 'Dad, you...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.