​‘शासन’ मध्ये भरत निगेटिव्ह भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2016 12:33 PM2016-03-18T12:33:12+5:302016-03-18T05:33:12+5:30

व्यावसायिक नाट्यरंगभूमीवरून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या भरतने आपल्या विविधांगी अभिनयातून स्वत:ची आगळी वेगळी ओळख निर्माण करून प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर ...

In Bharat Negative Role in 'Governance' | ​‘शासन’ मध्ये भरत निगेटिव्ह भूमिकेत

​‘शासन’ मध्ये भरत निगेटिव्ह भूमिकेत

googlenewsNext
यावसायिक नाट्यरंगभूमीवरून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या भरतने आपल्या विविधांगी अभिनयातून स्वत:ची आगळी वेगळी ओळख निर्माण करून प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर केले आहे. विशेष म्हणजे त्याचा विनोदी अभिनय हा सर्वांना खिळवून ठेवणारा आहे. 

मात्र ‘शासन’ या मराठी चित्रपटात भरत निगेटिव्ह भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाला. भरत हा अष्टपैलू अभिनेता असून त्याने अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांना हसवले आहे. मात्र शासन मध्ये त्याने साकारलेली निगेटिव्ह भूमिका प्रेक्षक कधी विसरू शकणार नाहीत. सत्तेच्या लोभासाठी वाटेल ते करणारा राजकारणी  भूमिका भरतने रंगविली आहे. 

श्रेया फिल्म्स या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती झाली असून भरत जाधवसह मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, मनवा नाईक, अदिती भागवत, वृंदा गजेंद्र, विक्रम गोखले, मोहन जोशी, नागेश भोसले, डॉ. श्रीराम लागू, अमेय धारे व किरण करमरकर कलाकार चित्रपटात आहेत. 

Web Title: In Bharat Negative Role in 'Governance'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.