भारतरत्न पं.भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार माणिक भिडे यांना जाहिर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 10:51 AM2017-09-26T10:51:51+5:302017-09-26T16:21:51+5:30

 राज्य शासनातर्फे भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिल्या जाणाऱ्या सन २०१७-१८ च्या पुरस्कारासाठी जेष्ठ गायिका माणिक भिडे ...

Bharat Ratna P. Bhimsen Joshi lifetime achievement award to Manik Bhide | भारतरत्न पं.भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार माणिक भिडे यांना जाहिर

भारतरत्न पं.भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार माणिक भिडे यांना जाहिर

googlenewsNext
 
ाज्य शासनातर्फे भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिल्या जाणाऱ्या सन २०१७-१८ च्या पुरस्कारासाठी जेष्ठ गायिका माणिक भिडे यांच्या नावाची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज मुंबई येथे केली.  

प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रु.५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. 
सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पं.केशव गिंडे, पं.नाथराव नेरळकर, श्रीमती कमलताई भोंडे या मान्यवरांच्या समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांची शिफारस केली होती. यापूर्वी हे पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं.जसराज, श्रीमती प्रभा अत्रे, पं.राम नारायण, श्रीमती परवीन सुलताना यांना प्रदान करण्यात आलेला आहे.  

पंडिता माणिक गोविंद भिडे. (जयपुर - अत्रोली घराणे) यांचा १९३५ साली कोल्हापूर येथे जन्म झाला. बालवयापासून संगीताची आवड असलेल्या माणिकताईंना आई-वडीलांकडून अभिजात संगीत शिकण्यास प्रोत्साहन मिळाले. जयपूर अत्रोली घराण्याचे आदयपुरुष उस्ताद अल्लादियाँ खाँ  यांचे पुत्र उस्ताद मजी खाँ व भूर्जी खाँ साहेब यांची तालीम लाभलेले श्री. मधुकरराव सडोलीकर हे माणिकताईंना गुरु म्हणून लाभले.
 
श्री गोविंद भिडे यांच्याशी विवाह होऊन माणिकताई मुंबईस वास्तव्यात आल्या. या काळात सुमारे १५ वर्षे गानसरस्वती किशोरी अमोणकर यांचे शिष्यत्व माणिकताईंनी पत्करुन गानसाधनेतला कळस गाठला. माणिकताई आकाशवाणीच्या मान्यता प्राप्त कलाकार असुन देश व विदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. त्यांच्या गान्यांच्या सीडीज बाजारात उपलब्ध आहेत.
 
सादरीकरणासोबत सक्षम गुरू हे त्यांचे मोठे योगदान संगीत क्षेत्राला लाभले आहे. संगीताची परंपरा जोपासणे हे कर्तव्य माणून माणिकताईंनी अनेक शिष्य घडविले त्यातील सौ. अश्विनी भिडे देशपांडे या त्यांच्या कन्या.   त्याचबरोबर माया धर्माधिकारी, प्रीती तळवलकर, ज्योती काळे, संपदा विपट, गीतीका वर्दे या व अनेक शिष्यांना घडविले. कलाकर, गुरू व एक व्यक्ती म्हणून श्रीमती माणिक भिडे यांचे सुसंपन्न असे व्यक्तीमत्व आहे.

Web Title: Bharat Ratna P. Bhimsen Joshi lifetime achievement award to Manik Bhide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.