Chandramukhi : बाई गं...! ‘चंद्रमुखी’ची कॉमेडियन भारती सिंगलाही पडली भुरळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 10:37 AM2022-04-26T10:37:36+5:302022-04-26T10:38:28+5:30

Chandramukhi Marathi Movie : चाहतेच नाहीत तर सेलिब्रिटीही ‘चंद्रमुखी’ चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. यात प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग हिचाही समावेश आहे. भारती ‘चंद्रमुखी’चं कौतुक करताना थकत नाहीये.

bharti singh is all praise for Amruta Khanvilkar and Addinath Kothare starrer Chandramukhi | Chandramukhi : बाई गं...! ‘चंद्रमुखी’ची कॉमेडियन भारती सिंगलाही पडली भुरळ 

Chandramukhi : बाई गं...! ‘चंद्रमुखी’ची कॉमेडियन भारती सिंगलाही पडली भुरळ 

googlenewsNext

चंद्रमुखी’ (Chandramukhi ) या आगामी चित्रपटानं सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली आहे. चित्रपटाचा ट्रेलर म्हणा, गाणी म्हणा सगळंच धुमाकूळ घालतंय. आपल्या दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणारी चंद्रा आणि ध्येयधुरंदर राजकारणी दौलत देशमाने यांची ही अनोखी प्रेमकहाणी कधी एकदा रिलीज होते, असं चाहत्यांना झालंय. चाहतेच नाहीत तर सेलिब्रिटीही या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. यात प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh ) हिचाही समावेश आहे. भारती ‘चंद्रमुखी’चं कौतुक करताना थकत नाहीये. सिनेमा रिलीज झालेला नाही. पण या चित्रपटातील गाण्यांनी भारतीला भुरळ घातली आहे. विशेषत: या चित्रपटातील लावणीवर ती फिदा आहे.

एका व्हिडीओद्वारे भारतीने ‘चंद्रमुखी’ आणि लावणी किंग आशिष पाटील याचं विशेष कौतुक केलं आहे. ‘माझा मित्र आशिष पाटील याचे चंद्रमुखी चित्रपटातील गाणं प्रदर्शित झालं, याचा मला मनापासून आनंद आहे. त्याचे आवडते म्युझिक डायरेक्टर अजय अतुल यांचं हे गाणं आहे.  चंद्रमुखी चित्रपटातील लावणी अतिशय सुरेख आहे. ती पाहिल्यानंतर खरंच खूप मस्त वाटलं. बाई गं हे गाणं नक्की पाहा. चंद्रमुखीच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा,’ असं भारती व्हिडीओत म्हणतेय.

‘चंद्रमुखी’च्या इन्स्टा पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यात त्यांनी भारतीचे विशेष आभार मानले आहेत. तू व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आभार. तुझे शब्द फार मोलाचे आहेत. तुला आणि तुझ्या बाळाला खूप आशीर्वाद,असं कॅप्शन देत हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

‘चंद्रमुखी’ हा सिनेमा येत्या 29 एप्रिलला चित्रपटगृहांत धडकणार आहे. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ कादंबरीवर आधारित या चित्रपटात अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत आहेत. प्रसाद ओक याने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे तर पटकथा व संवाद चिन्मय मांडलेकर याचे आहेत.

Web Title: bharti singh is all praise for Amruta Khanvilkar and Addinath Kothare starrer Chandramukhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.