विनोदवीर भाऊ कदमच्या कुटुंबियांचे फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 01:03 PM2019-07-10T13:03:45+5:302019-07-10T13:05:32+5:30

भाऊ कदमला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या कुटुंबियांबद्दल जाणून घ्यायची त्याच्या फॅन्सना नेहमीच इच्छा असते.

bhau kadam family photo | विनोदवीर भाऊ कदमच्या कुटुंबियांचे फोटो तुम्ही पाहिले का?

विनोदवीर भाऊ कदमच्या कुटुंबियांचे फोटो तुम्ही पाहिले का?

googlenewsNext
ठळक मुद्देभाऊला तीन मुली असून तो नेहमीच आपल्या मुलींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. 

भाऊ कदमने आज मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्या अभिनयाने त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. त्याच्या कॉमिक टायमिंगचे नेहमीच कौतुक केले जाते. फू बाई फू या कार्यक्रमामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचे विजेतेपद देखील त्याला मिळाले आहे. तो सध्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात तो दर भागात एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळतो. या कार्यक्रमामुळे केवळ मराठीच नव्हे तर अमराठी लोक देखील त्याचे फॅन झाले आहेत.

भाऊ कदमने टाइमपास, टाइमपास 2, फक्त लढ म्हणा, सांगतो ऐका, नारबाची वाडी, जाऊ द्या ना बाळासाहेब यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे बालपण मुंबईतील वडाळा येथे गेले आहे. वडाळा येथील बीपीटी क्वॉर्टर्समध्ये तो राहात होता.

त्याचे शालेय शिक्षण देखील वडाळ्याच्याच ज्ञानेश्वर शाळेत झाले. पण त्याच्या वडिलांचे अकाली निधन झाल्यानंतर त्याला वडाळ्यातील जागा सोडावी लागली. त्यानंतर तो कुटुंबियांसमवेत डोंबिवलीत राहायला गेला. त्याची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने त्याने अनेक छोटी-मोठी कामे केली. पण अभिनय हे नेहमीच त्याचे पहिले प्रेम होते.

भाऊ कदमला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या कुटुंबियांबद्दल जाणून घ्यायची त्याच्या फॅन्सना नेहमीच इच्छा असते. भाऊच्या पत्नीचे नाव ममता असून त्यांनी प्रेमविवाह केला होता. त्यांना तीन मुली असून भाऊ नेहमीच आपल्या मुलींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. 

अभिनयक्षेत्रात करियर करायचे असे त्याने अनेक वर्षांपूर्वीच ठरवले होते. त्याने रंगभूमीवरून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने अनेक नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. जाऊ तिथे खाऊ हे त्याचे नाटक त्या काळात चांगलेच गाजले होते. या नाटकामुळे त्याच्या करियरला एक दिशा मिळाली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

फू बाई फू या कार्यक्रमाने भाऊला एक ओळख मिळवून दिली. पण या कार्यक्रमाची ऑफर त्याने दोनदा नाकारली होती असे  म्हटले जाते. या कार्यक्रमानंतर त्याला अनेक ऑफर मिळायल्या लागल्या. त्याने तुझं माझं जमेना या मालिकेत देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. 


 

Web Title: bhau kadam family photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.