भाऊ कदम सांगतो, कॉमेडी करणे आव्हानात्मक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2017 06:56 PM2017-01-03T18:56:44+5:302017-01-05T12:13:41+5:30

बेनझीर जमादार आपल्या विनोदी शैलीने अभिनेता भाऊ कदम यांनी प्रेक्षकांना खळखळून हसविले आहे. आता प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता लवकरच ...

Bhau tells the story, making comedy challenging | भाऊ कदम सांगतो, कॉमेडी करणे आव्हानात्मक

भाऊ कदम सांगतो, कॉमेडी करणे आव्हानात्मक

googlenewsNext
बेनझीर जमादार


आपल्या विनोदी शैलीने अभिनेता भाऊ कदम यांनी प्रेक्षकांना खळखळून हसविले आहे. आता प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता लवकरच झाला बोभाटा या चित्रपटात झळकणार आहे. त्यांच्या या चित्रपटाविषयी लोकमत सीएनएक्सने साधलेला हा मनमोकळा संवाद.

1. या चित्रपटातील तुमची भूमिका काय आहे?
- या चित्रपटात मी दिनू नावाची भूमिका साकारत आहे. गावाच्या प्रश्नांशी त्याचं काही देणं घेणं नसते. त्याला फक्त त्याच्या लग्नाचं पडलेलं असतं. तो प्रत्येक महिलेला विचारत असतो की, लग्न झालं का? तसेच तो एका मुलीच्या प्रेमात ही पडतो. मात्र, ती मुलगी लग्न करण्यास नकार देते. मग त्यासाठी तो काय वेडेपणा करतो यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागेल. 

2. या चित्रपटाच्या अनुभवाविषयी काय सांगाल?
- या चित्रपटाचा अनुभव खूपच छान होता. दिलीप प्रभावळकर, संजय खापरे आणि कमलेश सावंत यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली आहे. त्याचप्रमाणे शिकायलादेखील खूप मिळाले. तसेच या चित्रपटातील काही कलाकारांबरोबरच नाटकदेखील केले आहे. त्यामुळे आमचं जे टीम वर्क आहे खूपच छान जमून आले आहे. 

3. तुम्ही सध्या एक टीव्ही शो करत आहात. त्यामुळे छोटा पडदा आणि रूपेरी पडदयाविषयी तुम्हाला काय फरक जाणवितो?
- हो, चित्रपटातून एकच भूमिका साकारण्यास मिळते. मात्र मी ज्या शोमध्ये काम करत आहे. तिथे सातत्याने मला वेगवेगळया भूमिका करण्यास मिळतात. तसेच फार कमी वेळात येथे खूप धमाल करता येते. मात्र चित्रपटात वेगळया पध्दतीचे काम करण्यात मिळते. हे काम कमी वेळात दाखवू शकत नाही. येथे फर्स्ट, मध्यान्ह आणि शेवट असतो. अशा पध्दतीने छोटया आणि रूपेरी पडदयाचा अनुभव खूपच वेगळा आणि मजेशीर असतो. 

4. कॉमेडी करणे आव्हानात्मक असते?
- हो नक्कीच. गंभीर भूमिका आपण सहज करू शकतो. मात्र कॉमेडीचे टाइमिंग व त्यापध्दतीचा नेमकेपणा यायला पाहिजे. तसेच ते मांडतादेखील आले पाहिजे. त्यावेळी ते टायमिंग  आणि रिअ‍ॅक्शन आली नाही तर तो प्रसंग फारच अवघड होवून बसतो. त्यामुळे कॉमेडी करणे खरचं खूप आव्हानात्मक असते. 

5. सध्या हिंदी आणि मराठीमध्ये कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो येण्याचे प्रमाण वाढत आहेत याविषयी तुमचे मत काय?
 - ही तर खूप चांगली गोष्ट आहे. कारण प्रेक्षक हे सासू सुनांचे कार्यक्रम पाहून कंटाळले आहेत. आता त्यांना मनोरंजन पाहिजे आहे. त्यात सध्याच्या प्रेक्षकांना कॉमेडी फार आवडत आहे. त्यामुळे प्रत्येक वाहिनीने कॉमेडी शो सुरू केले आहेत. उलट नवोदित कलाकारांसाठी आपली कला सादर करण्यासाठी हे चांगल व्यासपीठ मिळाले आहे. तसेच कलाकारांना कामदेखील मिळत आहे. 

6. भाऊ प्रेक्षकांना नेहमी कॉमेडी भूमिकेत पाहायला मिळतात, आता वेगळया भूमिकेत कधी पाहायला मिळणार?
- आता मुळातच माझी सुरूवातच कॉमेडीने झाली आहे.  प्रेक्षकांना मला कॉमेडीमध्ये पाहायला आवडते. भाऊ आले म्हणजे विनोद पाहिजे हे गणितच तयार झाले आहे. म्हणून मी कॉमेडी भूमिका साकारतो. कारण शेवटी कलाकार हे प्रेक्षकांसाठीच काम करत असतात. मात्र वेगळया भूमिका करण्याच्या संधी मिळाली तर नक्कीच मी करेन. 

Web Title: Bhau tells the story, making comedy challenging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.