रिअल लाईफ केमिस्ट्रीवर प्रश्न विचारताच लाजला भूषण प्रधान, अनुषासोबत अफेअरची रंगली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 13:24 IST2024-07-20T13:23:46+5:302024-07-20T13:24:34+5:30
एकीकडे पडद्यावर चर्चेत असलेला भूषण ऑफस्क्रीनही एका रोमँटिक केमिस्ट्रीमुळे चर्चेत आहे.

रिअल लाईफ केमिस्ट्रीवर प्रश्न विचारताच लाजला भूषण प्रधान, अनुषासोबत अफेअरची रंगली चर्चा
मराठमोळा अभिनेता भूषण प्रधानचे (Bhushan Pradhan) नुकतेच बॅक टू बॅक सिनेमे रिलीज झाले. आधी आलेला 'जुनं फर्निचर' गाजला. तर येत्या काही दिवसात त्याचा 'घरत गणपती' सिनेमा रिलीज होत आहे. यामध्ये त्याची आणि हिंदी अभिनेत्री निकिता दत्ताची जोडी जमली आहे. शिवाय सिनेमात अजिंक्य देव, अश्विनी भावे, शुभांगी गोखले सारखी दिग्गज स्टारकास्ट आहे. एकीकडे पडद्यावर चर्चेत असलेला भूषण ऑफस्क्रीनही एका रोमँटिक केमिस्ट्रीमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री अनुषा दांडेकरसोबत त्याच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. यावर प्रश्न विचारताच भूषण चक्क लाजतानाही दिसलाय.
'घरत गणपती'च्या टीमने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी भूषणला त्याच्या रिअल लाईफ केमिस्ट्रीबद्दल विचारण्यात आलं. 'घरत गणपतीमध्ये तुझी ऑनस्क्रीन केमिस्ट्री गाजतीये. पण सोशल मीडियावर तुझी आणखी एक केमिस्ट्री चर्चेत आहे. याबद्दल चाहत्यांना काय सांगशील? यावर तो लाजतच 'थँक्यू' असं म्हणाला. नंतर त्याने सिनेमातला लोकप्रिय 'सोडण्यासाठी हात धरत नाही मराठी माणूस' हा डायलॉगही ऐकवला. नंतर सावरासावर करत भूषण म्हणाला, "आज घरत गणपतीसाठी आपण आलोय. ही सुद्धा केमिस्ट्री खूप गाजतेय."
भूषणने थेट उत्तर देणं टाळलं असलं तरी त्याच्या लाजण्यातच सगळं काही आलं.भूषण सध्या 'जुनं फर्निचर'मधली त्याची सहकलाकार अभिनेत्री अनुषा दांडेकरला डेट करतोय. अनुषाने भूषणसोबत नुकतंच एक रीलही पोस्ट केलं. 'घरत गणपती'च्या नवसाची गौराई गाण्यावरचं ते रील होतं. यावरही त्यांची जोडी छान वाटतेय अशा कमेंट्स आल्या होत्या.