भूषण प्रधानच्या आयुष्यात आली 'ही' व्यक्ती, ही मैत्री आहे की प्रेम ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 12:12 IST2020-02-07T12:09:28+5:302020-02-07T12:12:09+5:30
भूषणने शेअर केलेल्या फोटोची सध्या जोरदार चर्चा आहे.

भूषण प्रधानच्या आयुष्यात आली 'ही' व्यक्ती, ही मैत्री आहे की प्रेम ?
सतरंगी रे', 'मिस मॅच', 'टाईमपास', 'टाईमपास-2', 'कॉफी आणि बरंच काही' अशा विविध सिनेमांमध्ये भूषणनं भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या होत्या. भूषण प्रधान नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असतो. आपल्या फॅन्सशी भूषण प्रधान कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट असतो. आपले आगामी सिनेमाचे फोटो, फिटनेसचे व्हिडिओ, हॉलिडेचे फोटो भूषण फॅन्ससाठी सोशल मीडियावर शेअर करत असतो.
भूषणने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोची सध्या जोरदार चर्चा आहे. भूषणने एका फोटो शेअर केला आहे ज्यात त्याच्यासोबत एक मुलगी पाठमोरी उभी दिसतेय. ही मुलगी कोण? ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री पूजा सावंत आहे.
भूषण आणि पूजाचे अफेअर सुरु आहे का ?, की ते कोणत्या सिनेमाचे प्रमोशन करतायेत हे आपल्याला ते दोघेचं सांगू शकतात. मात्र भूषणने शेअर केलेल्या एकंदर फोटोंवरून हे सिनेमाचे प्रमोशन असल्याचे आपल्या लक्षात येते. भूषण प्रमाणेच पूजानेदेखील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. आता हे प्रकरणं नेमकं काय आहे याचा उलगडा आपल्याला काही दिवसांत होईलच.
पूजा सावंतने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. यानंतर 'आता गं बया', 'झकास', 'सतरंगी रे', 'दगडी चाळ', 'नीळकंठ मास्तर' अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.