निवडणुकीच्या रिंगणात कलाकारांना मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2017 12:18 PM2017-02-07T12:18:15+5:302017-02-07T17:48:15+5:30

बेनझीर जमादार सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. हे वारे अजून ही रंगतदार बनविण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मोठ्या ...

A big demand for artists in the election fray | निवडणुकीच्या रिंगणात कलाकारांना मोठी मागणी

निवडणुकीच्या रिंगणात कलाकारांना मोठी मागणी

googlenewsNext
बेनझीर जमादार


सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. हे वारे अजून ही रंगतदार बनविण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे पाहायला मिळतेय. यामध्ये छोटया पडदयावरील कलाकारांना अधिक पसंती असल्याचे दिसत आहे. कारण मालिकांच्या माध्यमातून कलाकार हे घराघरात पोहोचत असतात. लहानांपासून ते मोठयांपर्यत या मालिकेच्या कलाकारांची क्रेझ निर्माण झालेली आहे. म्हणूनच आपल्या मतदाराला खूश करण्यासाठी उमेदवार कलाकारांची सर्वाधिक मागणी करत आहे. यामध्ये कोणकोणत्या कलाकारांना सर्वाधिक मागणी आहे याचा लोकमत सीएनएक्सने घेतलेला आढावा. 



हार्दिक जोशी - तुझ्यात जीव रंगला या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. या मालिकेतील राणा म्हणजेच हार्दिक जोशी हा महाराष्ट्राच्या घरात घरात अधिक लोकप्रिय झाला आहे. प्रेक्षकांच्या या आवडत्या कलाकाराला सर्वाधिक मागणी असल्याचे समजते. या अभिनेत्याला प्रचाराच्या आमंत्रणासाठी  दिवसाला दहा ते बारा फोन येत असतात. मात्र,  हा कलाकार कोणाच्याही वैयक्तिक कार्यक्रमात जाण्यापेक्षा सामाजिक कार्यात जाणे अधिक पसंत करतो आहे.



अमृता खानविलकर - आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर हीदेखील निवडणुकीच्या रिंगणात प्रेक्षकांच्या पसंतीमध्ये अग्रस्थानी आहे. याविषयी अमृता सांगते, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून राज्यातून विविध भागातून प्रचारासाठी विचारणा होत आहे. त्याचबरोबर उमेदवार घोषित झाल्यापासून जास्त प्रमाणात फोन खणखणत असल्याचेदेखील तिने यावेळी सांगितले. 



भाऊ कदम - आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता भाऊ कदम यांना देखील निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. भाऊ सांगतात, मध्यंतरी पिंपरी आणि पुणे शहरात मोठया प्रमाणात कार्यक्रम झाले. या कार्यक्रमाला २० ते २५ हजार प्रेक्षकांनी उपस्थिती लावली. त्यामुळे या गर्दीचा फायदा नक्कीच उमेदवाराला होत असणार असे मला वाटते.



मृणाल दुसानिस - अस्सं सासरं सुरेखबाई या मालिकेतून मृणालने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. त्याचबरोबर माझिया प्रि़याला प्रीत मिळेना, तू तिथे मी या मालिकादेखील तिच्या प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. म्हणूनच या अभिनेत्रीला ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातदेखील जास्त प्रमाणात निवडणुकीच्या रिंगणात आमंत्रित केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. 

Web Title: A big demand for artists in the election fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.