'मराठीतला पुष्पा सापडला'; विशाल निकमच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 15:32 IST2023-05-26T15:30:26+5:302023-05-26T15:32:59+5:30
Vishal Nikam: विशालचा हा फोटो पाहिल्यावर बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाती विजेती मेघा धाडे हिने कमेंट केली आहे.

'मराठीतला पुष्पा सापडला'; विशाल निकमच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत येणार शो म्हणजे बिग बॉस मराठी (bigg boss marathi). अलिकडेच या शोचं तिसरं पर्व पार पडलं. मात्र, तरीदेखील त्यात सहभागी झालेल्या स्पर्धकांची अजूनही सोशल मीडियावर चर्चा रंगते. त्यातलंच एक नाव म्हणजे विशाल निकम (Vishal Nikam) . बिग बॉस मराठी ३ ची ट्रॉफी जिंकणाऱ्या विशालने हे पर्व चांगलंच गाजवलं. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्यांची कायम चर्चा रंगत असते. यात अलिकडेच त्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यात त्याने केलेल्या हटके लूकची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
विशालने इन्स्टाग्रामवर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याचे केस प्रचंड वाढले असून त्याने फंकी शर्ट परिधान केला आहे. विशालचा हा फोटो एका सिनेमाच्या सेटवरचा असल्याचं पाहिल्यावर लक्षात येतं. विशालचा हा फोटो पाहिल्यावर बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाती विजेती मेघा धाडे हिने कमेंट केली आहे. "अरे पुष्पा सापडला", अशी कमेंट तिने केली आहे.
'Bigg boss'फेम विशाल निकमच्या भावाला पाहिलंय का? पाहा दोन्ही भावंडांचा झकास स्वॅग
दरम्यान, विशालच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. कोणी त्याला कबीर सिंग म्हटलंय. तर, काही जणांनी त्याला मराठीतला पुष्पाराज म्हटलं आहे. त्यामुळे त्याच्या या फोटोची सध्या तुफान चर्चा होत आहे. बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आलेल्या विशालने यापूर्वी दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत काम केलं आहे.