BMC च्या कर्मचाऱ्यांनी जात विचारली म्हणून पुष्कर जोग संतापला; पोस्ट करत म्हणाला…
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 13:51 IST2024-01-28T13:48:36+5:302024-01-28T13:51:57+5:30
पुष्कर हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो.

BMC च्या कर्मचाऱ्यांनी जात विचारली म्हणून पुष्कर जोग संतापला; पोस्ट करत म्हणाला…
मराठी सिनेसृष्टीतील 'चॉकलेट बॉय' अशी ओळख असलेल्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे पुष्कर जोग. 'बिग बॉस मराठी'मध्ये पुष्कर सहभागी झाला होता. या शोमुळे त्याला अधिक लोकप्रियता मिळाली. त्याने काही मराठी चित्रपटांमध्येही विविध भूमिका साकारल्या आहेत. तो कायमच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाते. पुष्कर हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. पुष्करनं नुकतंच एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला.
पुष्कर जोग इन्स्टाग्रामवर लिहलं, 'काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार'. अभिनेत्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
पुष्करच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, पुष्कर अलीकडेच बापमाणूस या मराठी सिनेमात दिसला. या सिनेमात पुष्करने प्रमुख भूमिका साकारली. या सिनेमात पुष्करसोबत अनुषा दांडेकर असे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी सिनेमात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो बिग बॉस मराठी या कार्यक्रमात देखील सहभागी झाला होता. त्याचे फॅन्स त्याच्या आगामी प्रोजेक्टची वाट बघत असतात.