शिवारमध्ये अवधूतचे सर्वात मोठे गाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2016 03:15 PM2016-11-06T15:15:18+5:302016-11-11T16:24:04+5:30

 Exclusive : प्रियंका लोंढे अवधूत गुप्तेची सर्वच गाणी प्रेक्षकांच्या मनामध्ये कोरली जातात.  आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना अवधूतच्या आवाजाची जादु ...

The biggest song in Avadh in Shimar | शिवारमध्ये अवधूतचे सर्वात मोठे गाणे

शिवारमध्ये अवधूतचे सर्वात मोठे गाणे

googlenewsNext
 Exclusive : प्रियंका लोंढे

अवधूत गुप्तेची सर्वच गाणी प्रेक्षकांच्या मनामध्ये कोरली जातात.  आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना अवधूतच्या आवाजाची जादु अनुभवायला मिळणार आहे. आगामी शिवार या चित्रपटामध्ये, दान मागते पिकाचे हे गाणे त्याने गायले आहे. आत्तापर्यंत मराठी चित्रपटामधील सर्वात जास्त लांबीचे हे गाणे असल्याचे समजतेय. जवळपास ९ मिनिटे १६ सेकंदाचे हे गाणे अवधूत सोबतच प्रिती निमकर या गायिकेने गायले आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक किरण सहाणे यांनी लोकमत सीएनएक्सशी संवाद साधताना सांगितले, कि या चित्रपटात आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या संवेदना मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळेच चित्रपटात दान मागते पिकाचं या गाण्याचा समावेश करण्यात आला आहे. सुधीर जाधव यांनी हे गाणे लिहिले आहे. शिवार या चित्रपटात आपल्याला अभिनेते नागेश भोसले व संग्राम साळवी हे दोघेही वडिल-मुलाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. वडिल शेतकरी असल्याने त्यांना वाटत असते की घरची शेती मुलानेच करावी. परंतु मुलाला बिझनेस करायचा असल्याने तो शेती करण्यास नकार देतो.  या दोघांचे चित्रपटातील डायलॉगही एकदम दमदार असल्याचे दिग्दर्शक भास्कर ताकवले यांनी सांगितले. संग्राम आणि नागेश यांची जोडी एका मालिकेतही चांगलीच जमली होती. या दोघांचे संवाद देखील त्यावेळी सुपरहिट झाले होते. आता पुन्हा एकदा शिवार चित्रपटाच्या निमित्ताने ही बाप-लेकाची जोडी मोठ्या पडदयावर येण्यास सज्ज झाली आहे. ज्योती ताकवले निर्मित शिवार हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे समजतेय. 

Web Title: The biggest song in Avadh in Shimar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.