Birth Anniversary: लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी इंटरनेटवर असलेल्या 'या' चुकीच्या माहितीमुळे चाहत्यांचा व्हायचा घोळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 08:00 IST2018-10-24T11:32:44+5:302018-10-26T08:00:00+5:30
जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत लक्ष्याने रसिकांचं मनोरंजन केलं.लक्ष्यानंतर गेल्या वर्षी लक्ष्याचा लेक अभिनय बेर्डे यानेही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.

Birth Anniversary: लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी इंटरनेटवर असलेल्या 'या' चुकीच्या माहितीमुळे चाहत्यांचा व्हायचा घोळ !
रसिकांना त्याने खळखळून हसवलं,रसिकांना सारं दुःख विसरायला लावलं आणि मनमुराद मनोरंजन केलं.मराठी असो किंवा हिंदी सिनेमा,त्याच्या कॉमेडीच्या भन्नाट आणि अचूक टायमिंगने रसिकांना अक्षरक्षा वेड लावलं.केवळ कॉमेडीच नाही तर कोणत्याही भूमिकेला जीव ओतून न्याय देणारा अभिनेता म्हणजे सा-यांचा लाडका 'लक्ष्या'.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सिनेमाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी सिनेमाच नाहीतर नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांची जन्मदिनांक जाणून घेण्याची त्यांच्या फॅन्सना उत्सुकता असते. इंटरनेटवर लक्ष्याच्या जन्म तारखेची नोंद 3 नोव्हेंबर 1954 अशी आहे. मात्र लक्ष्मीकांत बेर्डे यांची ही जन्मदिनांक चुकीची आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा यांचा जन्म 26 ऑक्टोबर झाला असून तिथीनुसार तो लक्ष्मीपूजनला साजरा केला जात असल्याची माहिती खुद्द प्रिया बेर्डे यांनी सीएनएक्समस्तीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. इंटरनेटवर मिळणारी सगळीच माहिती खरी असेल असं नाही. त्यामुळे इंटरनेटवरील अशीच चुकीची माहिती लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जन्म तारखेबाबत उपलब्ध होती. मात्र इंटरनेटवरील 3 नोव्हेंबर 1954 ही तारीख नंतर 26 ऑक्टोबर अशी अपडेट करत विकीपिडीयाने चूकही सुधारली होती.
लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाने रसिकांना पोट धरुन हसायला लावलं,त्यांचं मनोरंजन केलं.मात्र या जगातून लक्ष्याची अचानक एक्झिट झाली आणि सा-या रसिकांच्या डोळ्यात पाणी आलं.जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत लक्ष्याने रसिकांचं मनोरंजन केलं.लक्ष्यानंतर गेल्या वर्षी लक्ष्याचा लेक अभिनय बेर्डे यानेही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.
आता लक्ष्याच्या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीने रुपेरी पडद्यावर एंट्री मारली आहे.लक्ष्याच्या अभिनयाचा वारसा अभिनयसह ही व्यक्ती पुढे चालवणार आहे.ही व्यक्ती म्हणजे लक्ष्याची लाडकी लेक स्वानंदी.स्वानंदी बेर्डे ही एका मराठी सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे.किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शिक केला आहे.या सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे.या सातपैकी एका स्त्रीची भूमिका स्वानंदी हिने या सिनेमात साकारली आहे.