आणि म्हणूनच नाना पाटेकर यांचे राहणीमान, वागणं यातील साधेपणा आजही आहे कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 12:41 PM2021-01-01T12:41:08+5:302021-01-01T12:41:47+5:30
नाना पाटेकर यांच्या राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे. नाना सामान्य आयुष्य जगणे पसंत करतात. नाना पाटेकर यांचा पुण्याच्या खडकवासलामध्ये २५ एकरांमध्ये पसरलेले शानदार फार्महाऊसही आहे.
आपला दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकणाऱ्या आणि एक उत्तम माणूस असणारे नाना आज ७० वर्षांचे झाले आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात सरसावणाऱ्या आणि त्यांच्यात सामान्यांप्रमाणे मिसळणाऱ्या नाना पाटेकर यांच आज वाढदिवस.1978मध्ये 'गमन' सिनेमातून नाना यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. नाना यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 4 दशकापासून कार्यरत आहेत.त्यांनी त्यांच्या कमाईतील ९० टक्के रक्कम समाजसेवेसाठी खर्च केली आहे. नाना पाटेकर यांचे पाय आजही जमिनीवरच आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार नाना यांच्या नावे ७२ कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. यांत फार्महाऊस, कार आणि इतर कोट्यवधीच्या संपत्तीचा समावेश आहे. असं असूनही नाना पाटेकर यांच्या राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे. नाना सामान्य आयुष्य जगणे पसंत करतात. नाना पाटेकर यांचा पुण्याच्या खडकवासलामध्ये २५ एकरांमध्ये पसरलेले शानदार फार्महाऊसही आहे.
शहराच्या गर्दीपासून दूर जेव्हा निवांत श्वास घ्यायचा असतो त्यावेळी नाना तिथं जातात. दिग्दर्शक संगीत सिवान यांच्या २००८ मध्ये आलेल्या 'एक : द पावर ऑफ वन' सिनेमाचं चित्रीकरणही नानाच्या याच फार्महाऊसवर झालं होतं. या ठिकाणी नाना धान्य, गहू आणि हरभऱ्याचीही शेती करतात. घराजवळ अनेक प्रकारची झाडं-झुडपंही लावली आहेत. शिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गायी-म्हशी आहेत.
सात खोल्यांच्या या फार्महाऊसमध्ये एक मोठा हॉल आहे. फर्निचर आणि टेराकोटा फ्लोरने नाना यांचं हे फार्महाऊस सजलं आहे. याशिवाय नाना यांच्याकडे ८१ लाख रुपयांची ऑडी-Q7 कार आहे. तसंच १० लाखांची महिंद्रा स्कॉर्पियो आणि दीड लाख रु. किंमतीची रॉयल इनफिल्ड क्लासिक-३५० आहे. प्रत्येक व्यक्तीने त्याच्या गरजेनुसारच खर्च करायला हवा अशी नाना यांची धारणा आहे. त्यामुळेच आलिशान जीवन न जगता अत्यंत साधेपणाने राहतात.
नाना आवड म्हणून नाही तर परिस्थितीमुळे अभिनय क्षेत्रात आले. याच कारणामुळे ते आज साधारण आयुष्य जगतात. सिनेमात येण्यापूर्वी नाना रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग रंगवण्याचे काम करायचे. ते अप्लाइड आर्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. ते एक उत्कृष्ट स्केच आर्टिस्ट आहेत. मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी ते आरोपींचे स्केच बनवण्याचे काम करायचे. शिवाय 'प्रहार' सिनेमातील भूमिकेसाठी नाना यांनी ३ वर्षे लष्काराचे प्रशिक्षणही घेतलं होतं.