बोल्ड & बिनधास्त! सुप्रिया पिळगांवकर @56; मालदीवमधील त्यांचा 'हा' व्हिडीओ नक्की पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 13:32 IST2023-10-11T13:31:36+5:302023-10-11T13:32:15+5:30
Supriya pilgaonkar: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सुप्रिया पिळगांवकर यांनी काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता.

बोल्ड & बिनधास्त! सुप्रिया पिळगांवकर @56; मालदीवमधील त्यांचा 'हा' व्हिडीओ नक्की पाहा
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पिळगांवकर (supriya pilgaonkar). अशीही बनवाबनवी, नवरी मिळे नवऱ्याला, माझा पती करोडपती अशा कितीतरी सिनेमांमध्ये काम करुन त्यांनी मराठी कलाविश्वात आपलं भक्कम स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर त्यांनी मराठीसह हिंदी कलाविश्वातही काम केलं आहे. सुप्रिया पिळगांवकर यांचा आजही कलाविश्वात वावर असल्याचं पाहायला मिळतं. इतकंच नाही तर, इंडस्ट्रीप्रमाणेच त्या सोशल मीडियावरही चांगल्याच अॅक्टीव्ह आहेत.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सुप्रिया पिळगांवकर यांनी काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्या मालदीवला गेल्याचं दिसून येत आहे. जुलै महिन्यामध्ये सुप्रिया पिळगांवकर सचिन आणि श्रिया यांच्यासोबत मालदीवला गेल्या होत्या. विशेष म्हणजे यावेळी त्यांची एक नवीन बाजू पाहायला मिळाली.
सुप्रिया पिळगांवकर खऱ्या आयुष्यात अत्यंत बोल्ड आणि बिनधास्त असून याचा प्रत्यत या व्हिडीओमधून येत आहे. या व्हिडीओमध्ये त्या वॉटर स्पोर्ट करताना दिसत आहेत. तर, काही वेळा बीच आऊटफिटमध्येही दिसून आल्या.
दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करत जिंदगी इक सफर हैं सुहाना, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. सोबतच या व्हिडीओमध्ये त्यांनी लहान लहान व्हिडीओ एकत्र कोलाज केले आहेत. सध्या त्यांच्या या व्हिडीओर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडला आहे.