बॉलिवूड अभिनेत्री एली अवरामचं 'इलू इलू'मधून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण, म्हणते- "मराठी भाषेची..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 11:12 IST2024-12-17T11:10:48+5:302024-12-17T11:12:09+5:30

Elli Avram : २०१३ मध्ये 'मिकी व्हायरस' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये दाखल झालेल्या एली अवरामने आतापर्यंत हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. आता ती 'इलू इलू' या मराठी चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Bollywood actress Elli Avram makes her debut in the Marathi film industry with 'Ilu Ilu', says - ''Marathi language...'' | बॉलिवूड अभिनेत्री एली अवरामचं 'इलू इलू'मधून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण, म्हणते- "मराठी भाषेची..."

बॉलिवूड अभिनेत्री एली अवरामचं 'इलू इलू'मधून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण, म्हणते- "मराठी भाषेची..."

२०१३ मध्ये 'मिकी व्हायरस' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये दाखल झालेल्या एली अवरामने आतापर्यंत 'किस किस को प्यार करूं', 'नाम शबाना', 'पोस्टर बॅाईज', 'बाझार', 'मलंग', 'कोई जाने ना', 'गुडबाय' या हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. आता ती 'इलू इलू' या मराठी चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती या सिनेमात ‘मिस पिंटो’ या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मराठमोळ्या रूपातील एलीला पाहण्यासाठी मराठी प्रेक्षकांसोबतच तिचे चाहतेही आतुरले आहेत. 

एली अवरामने मिस पिंटोची व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आपल्याला अवगत नसलेल्या भाषेतील चित्रपटातील मुख्य भूमिका तिने मोठ्या धाडसाने आणि आत्मविश्वासाने साकारल्याचे चित्रपट पाहताना प्रेक्षकांना जाणवेल. मराठीत एन्ट्री करण्याबाबत एली म्हणाली की, ‘मला नेहमीच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. स्वीडीश, हिंदी, तामिळ आणि कन्नड चित्रपटांनंतर 'इलू इलू' च्या निमित्तानं मराठी भाषेची गोडी चाखण्याची संधी मिळाली आहे. यातील कॅरेक्टर माझ्या आजवर साकारलेल्या व्यक्तीरेखांपेक्षा खूप वेगळे आहे. एका नव्या लुकमध्ये मी प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुरुवातीला जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा थोडं दडपण जाणवलं होतं, पण पटकथा आणि कॅरेक्टर समजल्यावर मराठीत एंट्री करण्यासाठी हीच अचूक संधी असल्याची जाणीव झाल्यानं होकार दिला.


सिनेमात दिसणार हे कलाकार
फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ मनोरंजक लव्हस्टोरी ३१ जानेवारीला आपल्या भेटीला येत आहे.  या चित्रपटाचा रंगतदार टिझर एका शानदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटातील ‘इलू इलू’ या रोमँटिक गाण्यावर बहारदार परफॉर्मन्स करत एली आवरामने उपस्थितांची मने जिंकली. एलीसोबत वीणा जामकर, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ, वनिता खरात, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, आनंद कारेकर, निशांत भावसार, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात आहेत.

‘इलू इलू’ या दिवशी येणार भेटीला
‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत.  छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे  यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत. ‘इलू इलू’ ३१ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होतोय.  


 

Web Title: Bollywood actress Elli Avram makes her debut in the Marathi film industry with 'Ilu Ilu', says - ''Marathi language...''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.