हेमंत ढोमेच्या 'फसक्लास दाभाडे' साठी माधुरी दीक्षितची खास पोस्ट, प्रेक्षकांना म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:08 IST2025-01-24T18:03:43+5:302025-01-24T18:08:01+5:30
मराठी मनोरंजन विश्वात सध्या हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' या सिनेमाची चर्चा सुरु आहे.

हेमंत ढोमेच्या 'फसक्लास दाभाडे' साठी माधुरी दीक्षितची खास पोस्ट, प्रेक्षकांना म्हणाली...
Madhuri Dixit Post For Fussclass Dabhade: मराठी मनोरंजन विश्वात सध्या हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' या सिनेमाची चर्चा सुरु आहे. आज (२४ जानेवारी २०२५) या दिवशी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला आहे. दाभाडे कुटुंबीयांची गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'यलो यलो', 'तोड साखळी' या गाण्यांमुळे सिनेमाची सध्या चांगलीच हवा आहे. याशिवाय गेले महिनाभर 'फसक्लास दाभाडे'ची टीम तगडं प्रमोशन करते. अखेर आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान, या चित्रपटाचं मराठी कलाकारांकडून देखील कौतुक होताना दिसतंय. शिवाय प्रेक्षकांनी हा चित्रपट आवर्जून पाहा, असं आवाहन कलाकारांकडून करण्यात येत आहे. अशातच 'फसक्लास दाभाडे' पाहून बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अभिनेत्री माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी पोस्ट करत 'फसक्लास दाभाडे' सिनेमाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. 'फसक्लास दाभाडे'साठी पोस्ट करत माधुरी दीक्षितने लिहिलंय की, "अभिनंदन! सिद्धार्थ चांदेकर आणि टीम, या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून एक हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर आणल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हा सुखद अनुभव घेण्यासाठी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन 'फसक्लास दाभाडे' सिनेमा जरुर पाहा आणि 'फसक्लास' अनुभव घ्या!" अशा आशयाची पोस्ट शेअर करत अभिनेत्री चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे.
दरम्यान, 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे या तगड्या कलाकरांची फौज आहे. त्यामुळे या सिनेमासाठी प्रेक्षक देखील उत्सुक होते.