बॉयफ्रेंड सिद्धार्थ चांदेकरला या 'त्या' व्यक्तिने अशा शब्दात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,सोशल मीडियावर शेअर केला हा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 06:33 AM2018-06-16T06:33:12+5:302018-06-16T12:03:12+5:30

सध्या नवे लव्ह बर्ड्स सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे कपल सा-यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.नुकताच सिद्धार्थने त्याचा वाढदिवस साजरा ...

Boyfriend Siddhartha Chandekar, the person who gave such words to Happy Birthday, shared this special photo on social media. | बॉयफ्रेंड सिद्धार्थ चांदेकरला या 'त्या' व्यक्तिने अशा शब्दात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,सोशल मीडियावर शेअर केला हा खास फोटो

बॉयफ्रेंड सिद्धार्थ चांदेकरला या 'त्या' व्यक्तिने अशा शब्दात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,सोशल मीडियावर शेअर केला हा खास फोटो

googlenewsNext
्या नवे लव्ह बर्ड्स सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे कपल सा-यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.नुकताच सिद्धार्थने त्याचा वाढदिवस साजरा केला.मराठी सिनेसृष्टीतील अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या.मात्र इतक्या सगळ्या शुभेच्छांचा वर्षाव होत असताना एका व्यक्तीचा मेसेज खास ठरला.शुभेच्छा देणारी दुसरी तिसरी कोणीही नसून ती होती मिताली मयेकर.मितालीने अतिशय रोमँटिक अंदाजात सिद्धार्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.इंस्टाग्रामवर दोघांचा एक खास फोटो शेअर करत तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली.शुभेच्छा देत तिने म्हटले की,ज्या व्यक्तिवर मी जीवापाड प्रेम करते त्याला माझ्या कडून वाढदिवसाच्या खूप सा-या शुभेच्छा.तु माझ्यासाठी नेहमीच स्पेशल असणार आहे.लव्ह यु फॉरेव्हर असा सुंदर मेसेजही पोस्ट केला.यावर सा-यांनीच आनंद व्यक्त करत अनेक लाईक्स आणि कमेंटस नेटीझन्स देताना दिसले.त्यामुळे पुन्हा एकदा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळाले.शेअर केलेल्या फोटोमध्ये  दोघांचीही खास केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.मितालीकडून मिळालेल्या या रोमँटिक शुभेच्छांमुळे सिद्धार्थचा वाढदिवस स्पेशल बनला आहे.काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आणि मिताली दोघंही गोव्यात सध्या एकत्र वेळ घालवत असून सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळाले होते. याच स्पेशल क्षणांचे फोटो दोघांनीही आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले. व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी एकमेकांसह फोटो शेअर करुन त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. याआधी सिद्धार्थ आणि शनाया फेम रसिका यांच्यातील प्रेमाची चर्चा होती. सिद्धार्थ आणि रसिका कायमच एकत्र पाहायला मिळायचे. कोणताही कार्यक्रम असो, कॉफी घेणे असो किंवा मग सिनेमाला जाणं असो दोघंही त्याचे फोटो रसिकांसह सोशल मीडियावर शेअर करत. मात्र दोघांमध्ये काही तरी बिनसल्याची सध्या चर्चा आहे. याच दरम्यान सिद्धार्थच्या आयुष्यात मितालीने एंट्री घेतली. दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत चाललं आहे. 




याआधी सिद्धार्थ आणि शनाया फेम रसिका यांच्यातील प्रेमाची चर्चा होती. सिद्धार्थ आणि रसिका कायमच एकत्र पाहायला मिळायचे. कोणताही कार्यक्रम असो, कॉफी घेणे असो किंवा मग सिनेमाला जाणं असो दोघंही त्याचे फोटो रसिकांसह सोशल मीडियावर शेअर करत. मात्र दोघांमध्ये काही तरी बिनसल्याची सध्या चर्चा आहे. याच दरम्यान सिद्धार्थच्या आयुष्यात मितालीने एंट्री घेतली आणि शनाया साईडला झाली यामुळेच आज रिलेशनशिपमध्ये असणारे कपल उद्या एकत्र दिसतीलच असं नाही.त्यामुळेच कितने अजीब रिश्ते है यहाँ पे या गाण्याच्याओळी सेलिब्रिटींसाठी तंतोतंत लागू पडतात.

Web Title: Boyfriend Siddhartha Chandekar, the person who gave such words to Happy Birthday, shared this special photo on social media.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.