'बॉईज 2' १७ दिवसांमध्ये १६ करोडहून केली अधिक कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 03:29 PM2018-10-24T15:29:00+5:302018-10-24T15:29:25+5:30

ध्येर्या, ढुंग्या आणि कबीरची महाविद्यालयीन भानगड दाखवणाऱ्या, ' बॉईज २' चे इंजिन बॉक्स ऑफिसवर सलग तिसऱ्या आठवड्यातही सुसाट वेगाने ...

'Boyz 2' earns more than 16 crores in 17 days | 'बॉईज 2' १७ दिवसांमध्ये १६ करोडहून केली अधिक कमाई

'बॉईज 2' १७ दिवसांमध्ये १६ करोडहून केली अधिक कमाई

googlenewsNext

ध्येर्या, ढुंग्या आणि कबीरची महाविद्यालयीन भानगड दाखवणाऱ्या, 'बॉईज २' चे इंजिन बॉक्स ऑफिसवर सलग तिसऱ्या आठवड्यातही सुसाट वेगाने धावत आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत,अवधूत गुप्ते ह्यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत ५ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतीक लाडची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाच्या सुपर डुपर हिटचे नुकतेच मुंबई येथे मोठ्या थाटामाटात सेलिब्रेशन करण्यात आले.  'बॉईज २' चे निर्माते राजेंद्र शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सक्सेस पार्टीत, 'बॉईज ३' सिनेमाची घोषणादेखील करण्यात आली. तसेच या सिनेमाने अवघ्या १७ दिवसांमध्ये १६ करोडहून अधिक कमाई केली असल्याची माहिती इरॉस इंटरनेशनलचे नंदू अहुजा यांनी दिली.   

वरळी येथील आलिशान जेड गार्डनमध्ये पार पडलेल्या या पार्टीचा उपस्थितांनी मनमुराद आनंद लुटला. यादरम्यान, 'बॉईज २' चा दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी  'बॉईज २' ला दिलेल्या भरघोस प्रतिसादासाठी प्रेक्षकांचे आभार मानले. तसेच यापुढे 'बॉईज ३' साठी ऋषिकेश कोळीसोबत पुन्हा तयारीला लागणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी 'बॉईज २' च्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून, महाराष्ट्रात हाउसफुल असलेल्या या सिनेमाचे इरॉस इंटरनेशनलद्वारे जागतिक वितरणदेखील केले जात आहे. त्यामुळे,  'बॉईज' आणि 'बॉईज २' अश्या सलग दोन सिनेमे सुपरहिट देणारा विशाल आगामी 'बॉईज ३' मध्ये हॅटट्रीक करणार का, हे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय असेल. हे नक्की.

तीन शालेय मित्रांचे विश्व मांडणारा 'बॉईज' हा मराठी चित्रपट 2017 साली रसिकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील 'आम्ही लग्नाळू गाणं...' व चित्रपट अक्षरशः रसिकांनी डोक्यावर घेतला. त्यानंतर निर्मात्यांनी या सिनेमाचा सीक्वल बनवण्याचा निर्णय घेतला आणि नुकताच 'बॉईज'चा सीक्वल चित्रपटगृहात दाखल झाला. पहिल्या भागाप्रमाणेच 'बॉईज 2'ला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. त्यानंतर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा तिसरा भाग देखील बनवण्यात येणार आहे.
 

Web Title: 'Boyz 2' earns more than 16 crores in 17 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.