'बॉईज 2'ने कमावला ५ .११ कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 07:11 PM2018-10-08T19:11:40+5:302018-10-08T19:14:16+5:30

विशाल देवरूखकर दिग्दर्शित 'बॉईज २' ला देखील महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभत आहे.

'Boyz 2' earns Rs.5.11 crore | 'बॉईज 2'ने कमावला ५ .११ कोटींचा गल्ला

'बॉईज 2'ने कमावला ५ .११ कोटींचा गल्ला

googlenewsNext
ठळक मुद्दे'बॉईज २'ला मिळाला अनोखा चाहतातीन दिवसात 'बॉईज २'ने बॉक्स ऑफिसवर कमावला ५. ११ कोटींचा


विशाल देवरूखकर दिग्दर्शित 'बॉईज २' ला देखील महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभत आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसांमध्ये 'बॉईज २'ने बॉक्स ऑफिसवर ५. ११ कोटींचा कमावला आहे. ज्यात फ्रायडे ओपनिंग १.३० कोटी ,शनिवारी १.६१ कोटी आणि रविवारी २.२० कोटींचा समावेश आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शन अंतर्गत ५ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 


थिएटर व्हिजिटदरम्यान प्रथमेश सरतापे नावाचा एक अनोखा चाहता सिनेमाच्या टीमला दिसला. सामान्य प्रेक्षकांनी खच्चून भरलेल्या सिनेमागृहात प्रथमेश अंध असूनदेखील 'बॉईज २' चा मनमुराद आनंद लुटत असताना त्यांना दिसून आला. त्यामुळे, सिनेमा संपल्यानंतर त्याला भेटण्याचा मोह 'बॉईज २'च्या टीमला आवरता आला नाही. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड या प्रमुख कलाकारांसोबत दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी प्रथमेशची भेट घेतली. 'बॉईज २' ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी त्याचे आभारदेखील मानले. प्रथमेश हा एक उत्तम सिनेश्रोता असून, त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांचा आस्वाद घेतला आहे. गतवर्षीचा 'बॉईज' सिनेमा त्याला भरपूर आवडला होता आणि त्यामुळेच त्याला 'बॉईज २' पाहण्याची इच्छा होती. 
चित्रपट प्रदर्शित होऊन काही दिवस झाले आहेत. यापुढे आमची फिल्म चालेल की नाही आम्हाला माहित नाही, पण प्रथमेशला आमचा चित्रपट आवडला हेच आमच्या चित्रपटाचे यश आहे. चित्रपटाने कितीही कोटींचा धंदा केला, तरी प्रथमेशला झालेला आनंद हाच आमच्यासाठी सिनेमा सुपरहिट झाल्याचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया विशाल देवरुखकर यांनी दिली. 
सुपरहिट 'बॉईज' नंतर आता 'बॉईज २' चा देखील डंका सर्वत्र वाजत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या सिनेमाचे ३७५ शोज सुरु असून, यावर्षीच्या हिट चित्रपटांच्या यादीत 'बॉईज २' चा समावेशदेखील झाला आहे. कॉलेज तरुणाईचे भावविश्व मांडणाऱ्या 'बॉईज २' सिनेमाला ह्रषिकेश कोळीचे संवाद लाभले आहेत. लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी 'बॉईज २' च्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून, महाराष्ट्रात हाऊसफुल होत असलेल्या या सिनेमाचे इरॉस इंटरनॅशलद्वारे जागतिक वितरणदेखील केले जात आहे.

Web Title: 'Boyz 2' earns Rs.5.11 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.