'बॉईज २'च्या टीझरला मिळतोय उदंड प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 03:02 PM2018-09-03T15:02:43+5:302018-09-03T15:05:33+5:30

विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ चा हा धम्माकेदार सिक्वल ५ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Boyz2's teaser got huge response | 'बॉईज २'च्या टीझरला मिळतोय उदंड प्रतिसाद

'बॉईज २'च्या टीझरला मिळतोय उदंड प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्दे‘बॉईज’चा सिक्वल ५ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित ‘बॉईज’चा टीझर गाजतोय तरूणाईमध्येसुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड पुन्हा एकदा करणार धमाल

गावाकडच्या धैर्या, ढुंग्या आणि शहरातला साधा सरळ कबीर यांची धम्मालगिरी आगामी 'बॉईज २' मध्येदेखील दिसून येणार आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट एण्टरटेंन्मेंट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शन अंतर्गत प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आला. या पोस्टरनंतर 'बॉईज २' चा धमाकेदार टीझर नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पोस्टरप्रमाणे या टीझरलादेखील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या टीझरमधून सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांची लंपटगिरी आपल्याला पहावयास मिळते. शाब्दिक कोट्यांची युथफुल मस्ती दाखवणारा या टीझरने तरुणाईला वेड लावले आहे. हा टीझर दहा लाखांपेक्षा जास्त वेळा पाहून तब्बल तीन दिवस पहिल्या क्रमांकावर ट्रेडिंग केले आहे. त्यासाठी चित्रपटाच्या टीमने आभार मानले आहेत.


विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ चा हा धम्माकेदार सिक्वल ५ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. शिवाय ऋषिकेश कोळीच्या संवादलेखनाची बरसात या सिनेमात पाहायला मिळणार आहे. लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी या सिनेमाच्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून, इरॉस इंटरनेशनलद्वारे 'बॉईज २' चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखील केले जाणार आहे.'आम्ही लग्नाळू' म्हणत सर्व किशोरवयीन मुलांना 'बॉईज' या चित्रपटाने चांगलीच भुरळ पाडली होती. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर लाँच करण्यात आला. त्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. 

Web Title: Boyz2's teaser got huge response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.