​लवकरच प्रदर्शित होणार फुगे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2016 05:32 PM2016-11-25T17:32:00+5:302016-11-25T17:32:00+5:30

हजार-पाचशेच्या नोटांमुळे येत्या २ डिसेंबरला प्रदर्शित होणारा फुगे हा सिनेमा काही आठवड्यांसाठी पुढे ढकलला गेला असल्याचे सिनेमाच्या निर्मात्यांकडून सांगण्यात ...

Bubbles to be displayed soon | ​लवकरच प्रदर्शित होणार फुगे

​लवकरच प्रदर्शित होणार फुगे

googlenewsNext
ार-पाचशेच्या नोटांमुळे येत्या २ डिसेंबरला प्रदर्शित होणारा फुगे हा सिनेमा काही आठवड्यांसाठी पुढे ढकलला गेला असल्याचे सिनेमाच्या निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. अश्विन अंचन यांची निर्मिती आणि माय प्रोडक्शनच्या अनुराधा जोशी तसेच जीसिम्सचे अर्जुन सिंग ब-हान व कार्तिक निशानदार यांची सहनिर्मिती असलेला 'फुगे' सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच प्रदर्शित होईल. नोटाबंदीच्या या धोरणाचा परिणाम थोड्याफार प्रमाणात का असेना पण चित्रपटसृष्टीवर  देखील पडला असल्याचे दिसून येत आहे. मात्र, हा बदल भारताचे भविष्य घडवण्यास महत्वाचे ठरणार असल्याकारणामुळे आम्ही त्याचे स्वागत करत असल्याचे जीसिमचे कार्तिक निशानदार आणि अर्जुन सिंग ब-हान यांनी सांगितले. 'नोटाबंदीच्या निर्णयामुळे प्रेक्षकांना १००० आणि ५०० च्या नोटा चलनात आणता येत नाहीये, पयार्यी नोटा बदलून घेण्यामध्ये प्रेक्षक व्यस्त असताना, सिनेमा प्रदर्शित करणे आम्हांला योग्य वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. 'फुगे' हा सिनेमा पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत, मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता ते सहज शक्य नाही. अशावेळी कोणताही सिनेरसिक 'फुगे' सिनेमा पाहण्यापासून वंचित राहू नये, यासाठी सिनेमाच्या निर्मात्यांनी विचार करून सिनेमाचे प्रदर्शन पुढे लांबवले आहे. एस टीव्ही नेटवर्क्सचे इंदर राज कपूर प्रस्तुत, स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित तसेच स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे या मराठीतील दिग्गज स्टारची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाची प्रदर्शनापूवीर्ची प्रसिद्धी लक्षात घेता निर्मात्यांचा हा निर्णय स्वागत:र्य ठरत आहे. परंतू प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नसल्याचे देखील निर्मात्यांनी सांगितले आहे. फक्त काही आठवड्यांसाठीच हा सिनेमा पुढे ढकलला आहे. प्रेक्षक सिनेमागृहाकडे वळू लागल्याचे निदर्शनास येताच आम्ही चित्रपट प्रदर्शित करु असे देखील अर्जुन बºहान यांनी लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले.

Web Title: Bubbles to be displayed soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.