​ १० फेब्रुवारीला सिनेमागृहात उडणार फुगे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2017 12:50 PM2017-01-11T12:50:12+5:302017-01-11T12:51:32+5:30

स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित फुगे चित्रपटाने नुकतीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली. गुलाबी थंडीतील प्रेमाच्या महिन्यात म्हणजेच १० फेब्रुवारी २०१७ ...

Bubbles will be flying to the cinema hall on 10th February | ​ १० फेब्रुवारीला सिनेमागृहात उडणार फुगे

​ १० फेब्रुवारीला सिनेमागृहात उडणार फुगे

googlenewsNext
वप्ना वाघमारे दिग्दर्शित फुगे चित्रपटाने नुकतीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली. गुलाबी थंडीतील प्रेमाच्या महिन्यात म्हणजेच १० फेब्रुवारी २०१७ ला फुगे हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट खरंतर डिसेंबर महिन्यातच प्रदर्शित होणार होता. परंतू काही कारणास्तव या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते. आता या चित्रपटातील कलाकारांच्या चाहत्यांसाठी खुषखबर असून हा सिनेमा लवकरच सर्वांना पाहता येणार आहे. या चित्रपटाच्या बºयाच चर्चा रंगल्या होत्या. सिनेमातील गाणी आणि ट्रेलर पाहून प्रेक्षक हा चित्रपट बघण्यासाठी उत्सुक झाले होते. परंतू नोटाबंदिच्या काळातच हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. आणि त्याच दरम्यान या चित्रपटाचे प्रदर्शन देखील पुढे ढकलण्यात आले होते. या सर्व गोष्टींमुळे सिनेरसिकांच्या आनंदावर विरझण पडले होते. परंतू आता हा दिसखुलास चित्रपट लवकरच सर्वजण पाहू शकणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल साईट्सवर घोषित करण्यात आली आहे. चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर गेल्याने ़या सिनेमातील सर्वच कलाकारांनी त्याबदद्ल माहिती दिली होती. सिनेमातील स्वप्निल आणि सुुबोधचा लुक देखील झक्कास आणि हटके आहे. तर या चित्रपटातील गाणी सुदधा सुपरहिट झालेली पाहायला मिळत आहेत. इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत अश्विन आंचन, अर्जुनसिंग बºहान, कार्तिक निशानदार आणि अनुराधा जोशी यांनी फुगे चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात सुबोध भावे, स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, नीथा शेट्टी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चला तर मग १० फेबु्रवारीला फुगे या चित्रपटाच्या शो साठी तुम्हीही तयार रहा

Web Title: Bubbles will be flying to the cinema hall on 10th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.