Pooja Sawant : पूजा सावंतला करायचंय लग्न...! नवरा म्हणून हवा ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचा बायॅफ्रेन्ड!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 03:45 PM2022-08-22T15:45:51+5:302022-08-22T15:46:54+5:30

Pooja Sawant : होय, पूजाने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कुणासोबत? तर बॉलिवूडच्या एका हँडसम अभिनेत्यासोबत...

bus bai bus pooja sawant talk about her crush on sidharth malhotra | Pooja Sawant : पूजा सावंतला करायचंय लग्न...! नवरा म्हणून हवा ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचा बायॅफ्रेन्ड!!

Pooja Sawant : पूजा सावंतला करायचंय लग्न...! नवरा म्हणून हवा ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचा बायॅफ्रेन्ड!!

googlenewsNext

मराठमोही अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री. मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या पूजाने आता लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. होय, कुणासोबत? तर बॉलिवूडच्या एका हँडसम अभिनेत्यासोबत. विश्वास बसत नसेल तर बातमीसोबतचा हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा. या व्हिडीओत पूजा सावंतने बॉलिवूड अभिनेत्यावर क्रश असल्याची कबुली दिली आहे.

नुकतीच पूजा सावंत सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus) या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने तिच्या क्रशबद्दलही खुलासा केला. या कार्यक्रमात एका सेगमेंटमध्ये पाहुण्या कलाकाराला एखाद्या व्यक्तीचा फोटो दाखवला जातो आणि फोटोतील त्या व्यक्तीसोबत संबंधित पाहुण्या कलाकाराला सहप्रवासी असल्याप्रमाणे बोलायचं असतं.

यावेळी पूजा सावंतला बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा फोटो दाखवला गेला. हा फोटो पाहून पूजा चक्क लाजली. इतकंच नाही तर सिद्धार्थवरच्या प्रेमाची जाहिर कबुलीही तिने दिली. ‘माझा तुझ्यावर खूप मोठा क्रश आहे. माझं तुझ्याशी लग्न झालं तर मला आवडेल,’ असं ती लाजत लाजत म्हणाली.
पूजाला सिद्धार्थ मल्होत्रा आवडतो हे यानिमित्ताने सर्वांना कळलं. पण दुर्दैव...! सिद्धार्थ सध्या कियारा अडवाणीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. होय, दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. कियाराआधी तो आलिया भटच्या प्रेमात होता. अशात पूजाचा चान्स जरा कमी आहे. पण भविष्य कुणी पाहिलं?

पूजा सावंत आज एक आघाडीची अभिनेत्री आहे. पूजाने ‘बूगी वूगी’ या कार्यक्रमानंतर ‘महाराष्ट्र टाईम्स श्रावणक्वीन’ या   स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये तिने विजेतेपद पटकावले होते.  या स्पर्धेनंतर तिने ‘क्षणभर विश्रांती’ या मराठी चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. सोशल मीडियावरही पूजाची फार मोठी फॅनफॉलोविंग आहे. मराठी इंडस्ट्रीतील  फॅशन आयकॉन म्हणून पूजाकडे पाहिलं जातं.  ‘दगडी चाळ’ या सिनेमातील तिची भूमिका विशेष गाजली होती.  गेल्या शुक्रवारी या सिनेमाचा दुसरा भाग अर्थात ‘दगडी चाळ 2’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. 

Web Title: bus bai bus pooja sawant talk about her crush on sidharth malhotra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.