'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदमच्या ‘घे डबल’चा धमला टीझर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 14:23 IST2022-09-01T14:22:52+5:302022-09-01T14:23:21+5:30
'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शो मधून घराघरात पोहचलेला विनोदवीर भाऊ कदमने आपल्या टॅलेंटच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदमच्या ‘घे डबल’चा धमला टीझर आऊट
झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कॉमेडी शो मधून घराघरात पोहचलेला विनोदवीर भाऊ कदम (Bhau Kadam)ने आपल्या टॅलेंटच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. भाऊ कदम शेवटचा पांडू चित्रपटात पाहायला मिळाला होता. आता भाऊच्या आगामी सिनेमा ‘घे डबल’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अभिनेता भाऊ कदम आणि भूषण पाटील यांची दुहेरी भूमिका असणाऱ्या ‘घे डबल’ या चित्रपटाचं. जिओ स्टुडिओज व फाईन क्राफ्ट निर्मित ‘घे डबल’ चित्रपटाचे भन्नाट टीझर पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं. पोस्टरवरील भाऊ आणि भूषण यांच्या डबल रोलविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. आज याच चित्रपटाचा टीझर सगळ्यांच्या भेटीला आला आहे.
विश्वास जोशी यांनी ‘घे डबल’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज चित्रपटाचे निर्माते आहेत. येत्या ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमधून आपल्या खळखळून हसवण्यासाठी सज्ज असणाऱ्या या चित्रपटात कॉमेडी किंग भाऊ कदम आणि अभिनेता भूषण पाटील बरोबरच छाया कदम, भारत गणेशपुरे, किशोर कदम, ओमकार भोजने, विद्याधर जोशी आणि संस्कृती बालगुडे अशी तगडी स्टारकास्टही पाहायला मिळणार आहे.