चॅलेंज! गाडीच्या स्टेअरिंगसोबत खेळणाऱ्या या चिमुरडीला ओळखून दाखवा?, आहे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 11:45 AM2022-02-26T11:45:29+5:302022-02-26T11:46:55+5:30

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रीच्या बालपणीच्या फोटोला खूप पसंती मिळते आहे.

Challenge! Identify this girl who is playing with the steering wheel of a car ?, is a famous actress in Marathi Cineindustry. | चॅलेंज! गाडीच्या स्टेअरिंगसोबत खेळणाऱ्या या चिमुरडीला ओळखून दाखवा?, आहे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री

चॅलेंज! गाडीच्या स्टेअरिंगसोबत खेळणाऱ्या या चिमुरडीला ओळखून दाखवा?, आहे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री

googlenewsNext

कलाकार बऱ्याचदा आपल्या बालपणीचे फोटो शेअर करत असतात आणि आपल्या बालपणींच्या आठवणींना उजाळा देत असतात. दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीनेदेखील आपल्या बालपणीचा क्युट फोटो शेअर केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे गाढवाचं लग्नमधील गंगी म्हणजेच राजश्री लांडगे. राजश्री लांडगेने इंस्टाग्रामवर तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. 

अभिनेत्री राजश्री लांडगे सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच तिने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती गाडीच्या स्टेअरिंगसोबत खेळताना दिसते आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, एवढी ओढ लाखो करोडो रुपयांना पाहून होत नाही जेवढी लहानपणीचा फोटो पाहून लहानपणात जाण्याची होते.माझे बालपण. राजश्री लांडगेच्या बालपणीच्या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.


राजश्रीने सुरुवातीला काही नाटकांमध्ये काम केले. मात्र, ‘गाढवाचं लग्न’मधील गंगीच्या भूमिकेने तिला वेगळी ओळख मिळवून दिली. तसेच तिने ‘सिटीझन’ या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. तसेच यात ती प्रमुख भूमिकेत देखील होती. चित्रपटाची कथा आणि वेशभूषेची जबाबदारी तिने सांभाळली होती.

Web Title: Challenge! Identify this girl who is playing with the steering wheel of a car ?, is a famous actress in Marathi Cineindustry.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.