चांद तारोको छुनेकी "आशा"..., नम्रता संभेरावने 'नाच गं घुमा'च्या आठवणींना दिला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 12:26 PM2024-11-07T12:26:19+5:302024-11-07T12:27:36+5:30

Namrata Sambherao : नम्रता संभेराव हिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत 'नाच गं घुमा' या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Chand Taroko said "Asha"..., Namrata Sambherao recall to the memories of 'Nach Ga Ghuma' | चांद तारोको छुनेकी "आशा"..., नम्रता संभेरावने 'नाच गं घुमा'च्या आठवणींना दिला उजाळा

चांद तारोको छुनेकी "आशा"..., नम्रता संभेरावने 'नाच गं घुमा'च्या आठवणींना दिला उजाळा

महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) शोमधून अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) घराघरात पोहचली. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा 'नाच गं घुमा' (Naach Ga Ghuma Movie) हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने तिला आणखी प्रसिद्धी मिळवून दिली. दरम्यान आता तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

नम्रता संभेराव हिने 'नाच गं घुमा' सिनेमातील फोटो शेअर करत लिहिले की, चांद तारोको छुनेकी "आशा" आसमाँनोमे उडनेकी "आशा". तू माझ्यासाठी खूप खास आहे. यासोबत तिने ही भूमिका हृदयाच्या खूप जवळ असल्याचे म्हटले आहे.


परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूपच भावली होती. प्रदर्शनाआधीच यातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. 'नाच गं घुमा' हे टायटल साँग खूप हिट ठरले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास २७ कोटींची कमाई केली. या सिनेमात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव यांच्याबरोबर सारंग साठ्ये, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, सुप्रिया पाठारे, सुकन्या मोने यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. बालकलाकार मायरा वायकूळदेखील या सिनेमात पाहायला मिळाली. स्वप्निल जोशी आणि शर्मिष्ठा राऊत हिने या सिनेमाची निर्मितीची बाजू सांभाळली.

Web Title: Chand Taroko said "Asha"..., Namrata Sambherao recall to the memories of 'Nach Ga Ghuma'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.