चंद्रमुखी: 'नजाकत, सौंदर्य अन्..'; 'बाई गं...'चा BTS व्हिडीओ पाहून पडाल अमृताच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 04:25 PM2022-04-19T16:25:36+5:302022-04-19T16:27:31+5:30

Chandramukhi: सध्या सोशल मीडियावर 'चंद्रमुखी' या चित्रपटातील 'बाई गं..' ही लावणी चांगलीच गाजत आहे. ही लावणी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केली असून आर्या आंबेकरचा स्वरसाज त्याला लाभला आहे.

Chandramukhi marathi upcoming movie song bai g making video | चंद्रमुखी: 'नजाकत, सौंदर्य अन्..'; 'बाई गं...'चा BTS व्हिडीओ पाहून पडाल अमृताच्या प्रेमात

चंद्रमुखी: 'नजाकत, सौंदर्य अन्..'; 'बाई गं...'चा BTS व्हिडीओ पाहून पडाल अमृताच्या प्रेमात

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक याचा चंद्रमुखी हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याची कमालीची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर मुख्य भूमिका साकारत असून सध्या ती चंद्रमुखी याच नावाने सर्वत्र चर्चेत येत आहे. आतापर्यंत या चित्रपटातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली असून ती तुफान गाजत आहेत. त्यामुळेच या चित्रपटातील एका लावणीचा बिहाइंड द सीन असलेला एक छोटासा व्हिडीओ नृत्यदिग्दर्शक आशिष पाटीलने शेअर केला आहे.

सध्या सोशल मीडियावर 'चंद्रमुखी' या चित्रपटातील 'बाई गं..' ही लावणी चांगलीच गाजत आहे. ही लावणी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केली असून आर्या आंबेकरचा स्वरसाज त्याला लाभला आहे. इतकंच नाही तर या लावणीचं नृत्यदिग्दर्शन 'लावणीकिंग' म्हणून चर्चेत असणाऱ्या आशिष पाटील याने केलं आहे. त्यामुळेच त्याने ही लावणी नेमकी कशाप्रकारे बसवली गेली याचा छोटेखानी व्हिडीओ शेअर केला आहे.

"Some beautiful moments during the song shoot@amrutakhanvilkar अमृताच्या मनमोहक अदाकारीसाठी फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा पहावं असं... #BaiGaSong Out Now, असं कॅप्शन देत आशिष पाटीलने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये आशिष पाटील अत्यंत सुंदररित्या ही लावणी बसवताना दिसत आहे. यात नजाकत, सौंदर्य, लज्जा अशा सगळ्या अंगांचा सुंदररित्या वापर करण्यात आला आहे. तसंच प्रत्येक गोष्टीतील बारकावे लक्षात घेत त्याने ही लावणी बसवली आहे. त्याचप्रमाणे अमृतानेही उत्तमरित्या ही लावणी सादर केली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

'बाई गं' ही बैठकीची लावणी आहे त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही एक प्रकारची पर्वणीच आहे. या चित्रपटात अमृताने चंद्रा ही भूमिका साकारली आहे. तर अभिनेता आदिनाथ कोठारेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Chandramukhi marathi upcoming movie song bai g making video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.