दक्षिण भारतातही 'छावा'ची हवा! प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम पाहून भारावला संतोष जुवेकर, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 10:26 IST2025-03-10T10:21:34+5:302025-03-10T10:26:52+5:30
संपूर्ण राज्यासह देशभरात 'छावा'ची (Chhaava) क्रेझ पाहायला मिळते आहे.

दक्षिण भारतातही 'छावा'ची हवा! प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम पाहून भारावला संतोष जुवेकर, म्हणाला...
Santosh Juvekar: संपूर्ण राज्यासह देशभरात 'छावा'ची (Chhaava) क्रेझ पाहायला मिळते आहे. अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर जबदरस्त कमाई करत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. व्हॅलेंटाईन डेला म्हणजेच १४ फेब्रुवारीच्या दिवशी छावा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. छावाची क्रेझ पाहता हा सिनेमा तेलूगु भाषेत प्रदर्शित व्हावा अशी मागणी दक्षिण भारतातील सिनेप्रेमींनी केली होती. अखेर ७ मार्चला हा सिनेमा तेलुगू भाषेत प्रदर्शित करण्यात आला. 'छावा' तेलूगुमध्ये रिलीज केल्यानंतर चित्रपट दाक्षिणात्य सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरला आहे. याचा व्हिडीओ अभिनेता संतोष जुवेकरने (Santosh Juvekar) सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बॉलिवूड गाजवल्यानंतर हा सिनेमा आता टॉलिवूड सुद्धा गाजवताना दिसतो आहे. नुकताच संतोष जुवेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दाक्षिण भारतातील छावाच्या प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. "७ मार्चला तेलगू भाषेत 'छावा' प्रदर्शित झाला. तिकडच्या प्रेक्षकांच्या काही प्रतिक्रिया इथे तुमच्यासोबत शेअर करतोय. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...!" असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्याचबरोबर व्हिडीओवर दक्षिण भारतात छावाची हवा, इथे भाषा नाहीतर भावना सर्वकाही सांगून जातात. असं लिहिण्यात आलं आहे. त्याने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमामुळे अभिनेता संतोष जुवेकर प्रसिद्धीझोतात आला आहे. या चित्रपटात त्याने साकारलेल्या रायाजी या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. याशिवाय चित्रपटातील त्याचा लूक सुद्धा लक्ष वेधून घेत आहे.