पिफच्या नैतृत्वासाठी “म्होरक्या” सज्ज...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 09:25 AM2018-01-06T09:25:52+5:302018-01-06T14:55:52+5:30

भागात निवड झाली आहे. पिफमधील रसिक प्रेक्षकांना आता या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. त्यातच  या चित्रपटाचं पोस्टर लॉन्चिंग झालं. ...

"Chiefty" Ready for Pip's Ethics ... | पिफच्या नैतृत्वासाठी “म्होरक्या” सज्ज...

पिफच्या नैतृत्वासाठी “म्होरक्या” सज्ज...

googlenewsNext
गात निवड झाली आहे. पिफमधील रसिक प्रेक्षकांना आता या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. त्यातच  या चित्रपटाचं पोस्टर लॉन्चिंग झालं. चित्रपट समिक्षक, प्रेक्षक अगदी ज्यूरींनादेखील हा “म्होरक्या” भुरळ घालणार हे नक्की.स्वस्तिक प्रिती फिल्म प्रोडक्शन आणि अमर चित्रवाणी निर्मित “म्होरक्या” हा दिग्दर्शक अमर देवकर यांचा हा पहिलाच चित्रपट असून पोस्टरमुळे या चित्रपटाच्या कथानकाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण होत आहे. “म्होरक्या”चं पोस्टर लॉन्च नुकतंच पुण्यात पार पडलं यावेळी चित्रपटाचे निर्माते कल्याणजी पडाल,युवराज सरवदे आणि अमर भारत देवकर आणि म्होरक्याची टीम उपस्थित होती.चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये नायकाची म्हणजेच म्होरक्याचे सावलीरुपातील प्रतिबिंब पहायला मिळत आहे.ज्यात भारताच्या नकाशाची आकृती असल्याचा आभास निर्माण होत आहे.तर दुस-या पोस्टरमध्ये कथेतील सहनायक उलटा पहायला मिळत आहे.नेमकं तो उलटा आहे? का त्याच्या दृष्टीने लोकं उलटी पाहत आहे.अतिशय चिकित्सक पद्धतीची ही दोन पोस्टर लॉन्च झाली आहेत. लोकशाहीमध्ये नेतृत्व कसं असावं? हा विषय मार्मिकपणे मांडलेला आहे.या प्रश्नाची आणि उत्तराची चिकित्सा करणारा कथाप्रवास म्हणजे चित्रपट म्होरक्या.त्यामुळे पिफच्या प्रेक्षकांची नाविन्यपूर्ण आणि कलात्मक चित्रपट पाहण्याची तहान-भूक हा चित्रपट नक्की भागवेल अशी आशा दिग्दर्शक अमर देवकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

Also Read:सात देशांमधील चित्रपटतज्ञ करणार पिफचे परिक्षण

पिफ महोत्सवात दाखविल्या जाणा-या चित्रपटांच्या परीक्षणासाठी जगातील निवडक चित्रपट तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये अपर्णा सेन (भारत), प्रो. जेर्झी स्टर (पोलंड), गोरान पास्कलजेव्हिक (सर्बिया), जॉर्ज अरियागाडा (चिली), जेन्स फिशर (स्वीडन), गोवरी रामनारायण (भारत), बेनेट रत्नायके (श्रीलंका) आणि नर्गिस अबायर (इराण) यांचा समावेश आहे.या निवड झालेल्या चित्रपटांबद्दल बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले की, पर्यावरण ही यावर्षीच्या महोत्सवाची संकल्पना असून यावर्षीच्या महोत्सवासाठी आमच्याकडे जगभरातील ९५ देशांमधून तब्बल अकराशे चित्रपटांनी आपला सहभाग नोंदविला होता. पैकी निवड समितीने २२५ अधिक चित्रपटांचा समावेश महोत्सावात करण्यात आला असून हे सारे चित्रपट या महोत्सावा दरम्यान चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत.

Web Title: "Chiefty" Ready for Pip's Ethics ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.