मित्रांची धमाकेदार रियुनियन! 'चिकी चिकी बुबूम बुम' सिनेमा आता घरबसल्या पाहता येणार; कुठे होणार रिलीज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 15:42 IST2025-04-18T15:36:39+5:302025-04-18T15:42:55+5:30

'चिकी चिकी बुबुम बुम' सिनेमा आता घरबसल्या पाहता येणार; 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

chikichiki booboom boom marathi movie now can watched on ott platform | मित्रांची धमाकेदार रियुनियन! 'चिकी चिकी बुबूम बुम' सिनेमा आता घरबसल्या पाहता येणार; कुठे होणार रिलीज?

मित्रांची धमाकेदार रियुनियन! 'चिकी चिकी बुबूम बुम' सिनेमा आता घरबसल्या पाहता येणार; कुठे होणार रिलीज?

chikichiki booboomboom: प्रसाद खांडेकर दिग्दर्शित'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, ज्यांना सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहता आलेला नाही त्यांना आता घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे. थिएटर रिलीजनंतर जवळपास दीड महिन्यानंतर या सिनेमाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. शिवाय हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे, याची माहिती देखील देण्यात आली आहे. 


'चिकी चिकी बुबूम बुम'  सिनेमाच्या मेकर्सने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. "झालंय मित्रांचं reunioun आणि अडकलेत वेगळ्याच संकटात, संपेल गोंधळ की अडकतील आणखी कचाट्यात? 'चिकी चिकी बुबुम बुम' हा चित्रपट तुम्ही आता पाहू शकता @primevideoin वर...",  असं कॅप्शन देत या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची अपडेट देण्यात आली आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), प्रार्थना बेहेरे (prarthana behre), प्राजक्ता  माळी(Prajakata Mali) , प्रथमेश शिवलकर, रोहित माने, वनिता खरात अशी तगडी स्टारकास्ट आहे. त्यात आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होतोय. 

नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे तर संगीत रोहन रोहन यांचे आहे.  

Web Title: chikichiki booboom boom marathi movie now can watched on ott platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.