चिन्मय-हर्षवर्धन एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2016 12:38 PM2016-12-14T12:38:03+5:302016-12-14T12:38:03+5:30
अभिनेता चिन्मय मांडलेकर बॉलिवूड चित्रपट करीत असल्याचे आम्ही तुम्हाला सांगितलेच होते. हा चित्रपट बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित ...
अ िनेता चिन्मय मांडलेकर बॉलिवूड चित्रपट करीत असल्याचे आम्ही तुम्हाला सांगितलेच होते. हा चित्रपट बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित करणार आहे. या सिनेमातील चिन्मयची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही तर या चित्रपटामध्ये अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर देखील प्रमुख भूमिकेत दिसणार असल्यचे समजतेय. हर्षवर्धनने त्याच्या पहिल्याच मिर्झिया या चित्रपटामध्ये विषेश मेहनत घेतल्याचे पाहायला मिळाले होते. परंतू या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर हवे तितके यश मिळाले नाही. आता हर्षवर्धन पुन्हा एकदा नव्या जोमाने या चित्रपटासाठी सज्ज झाला असल्याचे समजतेय. चिन्मय आणि हर्षवर्धन या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. या सिनेमाचे चित्रीकरण सध्या राममंदिर स्टेशन येथे सुरु असल्याचे कळतेय. गेल्या अनेक दिवसांपासून चिन्मय या चित्रपटातील काही अॅक्शन सीन्सचे शूट करीत असल्याचे पाहायला मिळतेय. एवढेच नाही तर या चित्रपटामध्ये आपल्याला बरेच मराठी कलाकार देखील दिसणार आहेत. निशिकांत कामत, ऋषीकेश जोशी, प्रताप फड या मराठमोळ््या कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना या चित्रपटात पाहता येणार आहे. चिन्मयची या चित्रपटातील भूमिका मात्र महत्वपूर्ण असल्याचे समजतेय. परंतू त्याने या भूमिकेविषयी काहीही खुलासा त्याने अजुनपर्यंत केलेला नाही. सध्या विद्रमादित्य आणि हर्षवर्धन भावेश जोशी या चित्रपटाचे चित्रीकरण करीत असल्याचे कळतेय. त्यामुळे हा चित्रपट चिन्मयचाच तर नाही ना असा प्रश्न देखील पडला आहे. या चित्रपटामध्ये कोणती अभिनेत्री असणार आहे ते काही समजलेले नाही. परंतू चिन्मय आणि हर्षवर्धला मोठ्या पडदयावर एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक असणार यात काही शंकाच नाही.