चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे आणि प्रियदर्शन जाधव यांची प्रमुख भूमिका असलेला हलाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 10:22 AM2017-09-26T10:22:35+5:302017-09-26T15:52:35+5:30

समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब नेहमीच रुपेरी पडद्यावर उमटत असते. याच कारणांमुळे रुपेरी पडद्याला समाजमनाचा आरसाही मानले जाते. तिहेरी तलाकचा ...

Chinmay Mandlekar, Pritam Kagane and Priyadarshan Jadhav have played the lead role | चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे आणि प्रियदर्शन जाधव यांची प्रमुख भूमिका असलेला हलाल

चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे आणि प्रियदर्शन जाधव यांची प्रमुख भूमिका असलेला हलाल

googlenewsNext
ाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब नेहमीच रुपेरी पडद्यावर उमटत असते. याच कारणांमुळे रुपेरी पडद्याला समाजमनाचा आरसाही मानले जाते. तिहेरी तलाकचा मुद्दा मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील हाच मुद्दा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘हलाल’ या चित्रपटात शिवाजी लोटण पाटील यांनी तिहेरी तलाकचा मुद्दा त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून मांडला आहे.
मागील काही दिवसांपासून तिहेरी तलाक हा मुद्दा विविध पातळ्यांवर चर्चिला जात आहे. पण विवाह आणि तलाक या जीवनातील दोन महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मुस्लिम स्त्रियांच्या भावनांचा कितपत आदर केला जातो हा विषय वादातीत आहे. पाटील यांनी ‘हलाल’ या आपल्या आगामी चित्रपटात याच ज्वलंत प्रश्नाला हात घातला आहे. राजन खान यांच्या ‘हलाला’ या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे आणि प्रियदर्शन जाधव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून तिहेरी तलाकचा मुद्दा अधोरेखित करताना पाटील यांनी त्रिकोणी प्रेमकथेची किनार जोडली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चिन्मय, प्रितम आणि प्रियदर्शन प्रथमच एकत्र आले आहेत.
अमोल कागणे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण कागणे यांनी अमोल कागणे फिम्ल्सच्या बॅनरखाली‘हलाल’ची निर्मिती केली असून प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने कान फिल्म फेस्टिव्हल, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, पुणे फिल्म फेस्टिव्हल, औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हल, गोवा फिल्म फेस्टिव्हल यांसारख्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट महोत्सवही गाजवले आहेत. निशांत धापसे यांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. चिन्मय, प्रितम आणि प्रियदर्शनसोबतच विजय चव्हाण, छाया कदम, अमोल कागणे, विमल म्हात्रे, संजय सुगावकर आदी कलाकारांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे छायांकन रमणी रंजनदास यांचे असून निलेश गावंड यांनी चित्रपटाचे संकलन केले आहे.
हलाल हा चित्रपट २९ सप्टेंबर २०१७ ला प्रदर्शित होणार आहे.

Also Read : हलाल चित्रपटाचा टीझर लाँच

Web Title: Chinmay Mandlekar, Pritam Kagane and Priyadarshan Jadhav have played the lead role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.