अफजलखानाच्या वधाचा थरार; 'शेर शिवराज'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 04:20 PM2022-08-06T16:20:50+5:302022-08-06T16:42:12+5:30

'शेर शिवराज' या सिनेमाच्या माध्यमातून अफजलखानाच्या वधाचा थरार प्रेक्षकांना अनुभवता येत आहे. 14 ऑगस्टला या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.

Chinmay Mandlekar starred Sher Shivraj will have its world television premiere on august 14 | अफजलखानाच्या वधाचा थरार; 'शेर शिवराज'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

अफजलखानाच्या वधाचा थरार; 'शेर शिवराज'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

googlenewsNext

Sher Shivraj : मराठीत काही काळापासून बरेच ऐतिहासिक चित्रपट येत आहेत. छत्रपती  शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटींच्या घरात दमदार कमाई  करताना दिसतायत. 'शिवराज अष्टक' या मालिकेतील दिग्दर्शक दिगपाल लांजेकरांचा 'शेर शिवराज- स्वारी अफझलखान'  हा चौथा सिनेमा. या चित्रपटातील कलाकारांच्या भूमिका, संगीत सगळ्यालाच प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक दिवस झाले असले तरीही  या चित्रपटाची क्रेझ अजूनही प्रेक्षकांमध्ये दिसून येते.सिनेमागृहात धुमाकूळ घालणारा हा सिनेमा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. रविवार १४ ऑगस्टला दुपारी १२.०० वा. 'शेर शिवराज' , या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीज वर होणार आहे.

14 ऑगस्टला होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

'शेर शिवराज' या सिनेमाच्या माध्यमातून अफजलखानाच्या वधाचा थरार प्रेक्षकांना अनुभवता येत आहे. शिवरायांच्या अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन 'शेर शिवराज' या सिनेमात घडत आहे. यासोबतच त्या काळातील सामाजिक, राजकीय वातावरण, राजांच्या अचूक निर्णयांचा रयतेला होणारा फायदा, शत्रूंची आक्रमणं परतवून लावण्याची शक्ती, अफझलखानाची स्वारी, खानाचा वध करत विजापूरी साम्राज्याला राजांनी लावलेला सुरुंग आणि त्यामुळं हादरलेल्या आदिलशाहीचं यथोचित चित्रण 'शेर शिवराज' मध्ये दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे.

'शेर शिवराज' सिनेमात चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अफजलखानाच्या भूमिकेत मुकेश ऋषी दिसत आहेत. जिजाऊ आऊसाहेबांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर सुभेदार तानाजी मालुसरे, दिग्पाल लांजेकर बहिर्जी नाईक,  वर्षा उसगांवकर बडी बेगम, समीर धर्माधिकारी कान्होजी जेधे,  अभिनेत्री मृण्मयी देशपांडे केसरच्या भूमिकेत तर  अक्षय वाघमारे पिलाजी गोळे,  विक्रम गायकवाड सरनोबत नेताजी पालकर, आस्ताद काळे विश्वास दिघे,  वैभव मांगले शिवाजी महाराजांचे वकील गोपीनाथ बोकील,  सुश्रुत मंकणी येसाजी कंक, दीप्ती केतकर मातोश्री दिपाईआऊ बांदल, माधवी निमकर मातोश्री सोयराबाई राणीसरकार, ईशा केसकर मातोश्री सईबाई राणीसरकार, रिशी सक्सेना फाझल खानची तर निखील लांजेकर नरवीर जीवा महाले, तसेच बिपीन सुर्वे सर्जेराव जेधे यांच्या भूमिकेत आहेत.

Web Title: Chinmay Mandlekar starred Sher Shivraj will have its world television premiere on august 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.