"त्यामुळेच तुमचा अभिमान वाटतो.." छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या अँकरला चिन्मयनं थांबवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 03:47 PM2022-03-19T15:47:07+5:302022-03-19T20:42:38+5:30

चिन्मय महाराजांबद्दल असलेले प्रेम पाहून चाहते भारावून गेले. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Chinmay stopped the anchor who mentioned chhatrapati shivaji maharaj video goes viral | "त्यामुळेच तुमचा अभिमान वाटतो.." छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या अँकरला चिन्मयनं थांबवलं

"त्यामुळेच तुमचा अभिमान वाटतो.." छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या अँकरला चिन्मयनं थांबवलं

googlenewsNext

सध्या सर्वत्र द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या चित्रपटाची चर्चा होताना दिसते आहे. हा चित्रपट काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करतो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटात मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar)ने दहशतवादी बिट्टा कराटेची भूमिका साकारली आहे. याआधी चिन्मयने अलीडकडेच रिलीज झालेल्या पवनखिंड सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

अलीकडेच एक वाहिनीला मुलाखत देताना अँकरने चिन्मयचा परिचय देताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख शिवाजी असा केला. यावर चिन्मयने त्याला थांबवत छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करावा असे सांगितले. त्यावेळी त्याचे महाराजांबद्दल असलेले प्रेम पाहून चाहते भारावून गेले. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

चिन्मयनं या मुलाखतीचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘कारण काही गोष्टी ‘Optional’ नसतात. कधीच. छत्रपती शिवाजी महाराज की जय.’ अनेकांनी या पोस्टवर लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत. ह्या मुळेच तुमचा अभिमान आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, निव्वळ अभिमान, हिंदू नृसिंह प्रभू श्री राजा शिवछत्रपती अशा कमेंट्स चिन्मयच्या या पोस्टवर आल्या आहेत.  

Web Title: Chinmay stopped the anchor who mentioned chhatrapati shivaji maharaj video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.