बाप-लेकीचं प्रेमळ नातं, चिराग पाटीलनं शेअर केला लेकीसोबतचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 15:41 IST2019-07-30T15:37:27+5:302019-07-30T15:41:10+5:30
चिराग पाटीलने 'वजनदार', 'राडा रॉक्स', 'असेही एकदा व्हावे' अशा विविध चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय 'चार्जशीट', 'ले गया सद्दाम' अशा हिंदी चित्रपटातही त्याच्या अभिनयाची जादू दिसली आहे.

बाप-लेकीचं प्रेमळ नातं, चिराग पाटीलनं शेअर केला लेकीसोबतचा फोटो
तसा तो भारताच्या प्रसिद्ध माजी क्रिकेटरचा मुलगा. मात्र वडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता त्याने अभिनय क्षेत्र करिअर म्हणून निवडलं. तो अभिनेता म्हणजे भारताचे माजी क्रिकेटर संदीप पाटील यांचा लेक चिराग पाटील. आपल्या अभिनयाने चिरागने रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. 'वजनदार', 'राडा रॉक्स', 'असेही एकदा व्हावे' अशा विविध चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय 'चार्जशीट', 'ले गया सद्दाम' अशा हिंदी चित्रपटातही त्याच्या अभिनयाची जादू दिसली आहे. चिराग अभिनेता आणि माजी क्रिकेटरचा लेक असण्यासोबतच एक प्रेमळ बापही आहे.
चिराग कायमच आपले कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतंच त्याने शेअर केलेल्या फोटोत बाप-लेकीचं प्रेमळ नातं पाहायला मिळत आहे. चिराग लेक रायनासह खेळत निवांत आणि सुखी क्षणांचा आनंद घेत असल्याचं यांत दिसत आहे. या फोटोला कॅप्शनची गरजच नाही असं चिरागने म्हटले आहे. या फोटोवर रसिकांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
काही दिवसांपूर्वी चिरागने आजोबा-नातीचा म्हणजेच संदीप पाटील आणि रायनाचा फोटोही शेअर केला होता. या फोटोलाही रसिकांचे बरेच लाईक्स मिळाले. लवकरच चिराग कबीर खान दिग्दर्शित आणि रणवीर सिंह स्टारर '८३' या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात चिराग आपल्या वडिलांची म्हणजेच संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे.