चिराग पाटीलचा न्यू लूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2016 08:07 AM2016-09-02T08:07:09+5:302016-09-02T13:40:50+5:30
कलाकार म्हटले की, नेहमी हटक्या स्टाइलमध्येच राहावे लागते. चाहत्यांसमोर वेगवेगळया लूकमध्ये कलाकार समोर आले की, त्यांचे चाहतेदेखील त्यांचे भरभरून ...
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">कलाकार म्हटले की, नेहमी हटक्या स्टाइलमध्येच राहावे लागते. चाहत्यांसमोर वेगवेगळया लूकमध्ये कलाकार समोर आले की, त्यांचे चाहतेदेखील त्यांचे भरभरून कौतुक करत असतात. तसेच हटके स्टाइलमध्ये राहणे हे कलाकारांच्या करिअरसाठीदेखील अधिक चांगले असते. म्हणून हे कलाकार विविध ठिकाणी विविध लूकमध्ये झळकत असतात. आता हेच पाहा ना, अभिनेता चिराग पाटील हा नेहमीच थोडया लांब केसांच्या हेअरस्टाइलमध्ये दिसत असतो. पण आता चिरागने त्याच्या लांब केसांना कात्री लावल्याचे दिसत आहे. नुकताच चिरागने शॉर्ट हेअरकट केला आहे. त्याने केलेल्या या शॉर्ट हेअरकटचा फोटो सोशलमिडीयावर अपडेट केला आहे. माय न्यू लूक म्हणून त्याने स्टेटसदेखील अपडेट केले आहे. त्याचबरोबर चिराग सांगतो, या न्यू हेअरकटमध्ये मी खूपच आनंदित आहे.असो, पण चिराग या न्यू लूकमध्ये खूपच छान दिसत आहे. त्याचा हा न्यू लूक नक्कीच त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस पडेल यात शंकाच नाही.