चिराग वजनदारमध्ये साकारतोय 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2016 02:53 PM2016-11-02T14:53:20+5:302016-11-03T13:03:45+5:30

सध्या वजनदार या चित्रपटाची चर्चा खूप रंगली आहे. या चित्रपटातील सई ताम्हणकर आणि प्रिया बापटची वजनदार भूमिकेतील फोटो सोशल ...

Chirag is the role of 'O' role in the weight of the weight | चिराग वजनदारमध्ये साकारतोय 'ही' भूमिका

चिराग वजनदारमध्ये साकारतोय 'ही' भूमिका

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">सध्या वजनदार या चित्रपटाची चर्चा खूप रंगली आहे. या चित्रपटातील सई ताम्हणकर आणि प्रिया बापटची वजनदार भूमिकेतील फोटो सोशल मीडियावरदेखील  हिट होताना दिसत आहे. तसेच या अभिनेत्रींसोबत अभिनेता सिध्दार्थ चांदेकर देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अशा या तीन तगडया कलाकारांसोबत प्रेक्षकांना आणखी एक नवीन चेहरा वजनदार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा नवीन चेहरा असणार आहे अभिनेता चिराग पाटीलचा. या चित्रपटासाठी चिरागने वजन जरी वाढविले नसले तरी या चित्रपटात चिरागची भूमिका वजनदार असणार आहे. या भूमिकेविषयी लोकमत सीएनएक्सला चिराग सांगतो, ''या चित्रपटात मी ओंकार नावाच्या भूमिका असणार आहे. या चित्रपटात मी सईच्या पतीची भूमिका करणार असून तो एका बिझनेसमॅनचा मुलगा असतो. त्याचबरोबर त्याचे वडील या चित्रपटात खूप तत्वांवर आणि नियमांवर चालणारे असतात. तो देखील त्याचे घर, परिवार हेच त्याचे विश्व मानत असतो. त्यामुळे वडिलांच्या तत्वांवर आंधळेपणाने विश्वास करून ते म्हणतील तिच योग्य दिशा समजत असतो. त्याच्या या तत्वशील फॅमिलीमध्ये लग्नानंतर सईचे आगमन होते. त्यामुळे सईला देखील ही तत्व लागू होतात. पण सई या तत्वांवर चालते की नाही? हे कळण्यासाठी तुम्हाला ११ नोव्हेबरला वजनदार हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहावा लागेल. सचिन कुंडलकर दिग्दर्शित हा चित्रपट असणार आहे. यापूर्वी चिरागने राडा रॉक्स या चित्रपटातदेखील काम केले होते. या चित्रपटामध्येदेखील चिराग हा अभिनेत्री सई ताम्हणकरसोबत झळकला होता.

Web Title: Chirag is the role of 'O' role in the weight of the weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.