'चिरंजीव'चे पोस्टर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:06 AM2016-01-16T01:06:48+5:302016-02-10T08:27:53+5:30
काळानुरूप पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती, रूढी-परंपरा या ग्लोबल टेक्नॉलॉजीच्या जगात बदलत आहेत. त्यामुळे दोन पिढय़ांमध्ये असलेला ताण, अलिप्तपणा सांधताना ...
क ळानुरूप पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती, रूढी-परंपरा या ग्लोबल टेक्नॉलॉजीच्या जगात बदलत आहेत. त्यामुळे दोन पिढय़ांमध्ये असलेला ताण, अलिप्तपणा सांधताना बर्याचदा पाहायला मिळतो. अशाच काही अंधश्रद्धा, रूढी-परंपरा अशा गोष्टींवर भाष्य करणारा एक चित्रपट येत आहे 'चिरंजीव'. हुशार आणि नानाविध भूमिका साकारणारा अभिनेता भरत जाधव यामध्ये प्रमुख भूमिका साकारत असून त्यांच्यासोबत भार्गवी चिरमुले, किशोर कदम, प्रसाद ओक आणि अलका कुबल महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. नेहमी साध्या किंवा नेहमीच्या भूमिकांमध्ये दिसणारा भरत जाधव या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश मोरे यांनी केले असून, मुंबई सिने इंटरनॅशनल्समवेत कार्निव्हल मोशन पिक्चर्स चित्रपटाची निर्मिती करीत आहेत.