'चिठ्ठी'वर उमटली प्रेक्षकांच्या पसंतीची मोहोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 07:04 AM2018-01-22T07:04:29+5:302018-01-22T12:34:29+5:30

प्रियकरानं प्रेयसीला पाठवलेली "चिठ्ठी" न मिळाल्यानं किती गोंधळ उडू शकतो याचं धमाल चित्रण असलेला "चिठ्ठी" हा चित्रपट नुकताच प्रदर्शित ...

'Chitthi' emerges with favorite favorites of the audience | 'चिठ्ठी'वर उमटली प्रेक्षकांच्या पसंतीची मोहोर

'चिठ्ठी'वर उमटली प्रेक्षकांच्या पसंतीची मोहोर

रियकरानं प्रेयसीला पाठवलेली "चिठ्ठी" न मिळाल्यानं किती गोंधळ उडू शकतो याचं धमाल चित्रण असलेला "चिठ्ठी" हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. मनोरंजक कथानक, उत्तम अभिनय, श्रवणीय संगीत असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. 

डांगे एंटरटेन्मेंटच्या विशाल डांगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून नव्या दमाच्या दिग्दर्शक वैभव डांगे याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री धनश्री काडगावकर, शुभंकर एकबोटे ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर आली आहे. त्यांच्यासह अश्विनी गिरी, श्रीकांत यादव, नागेश भोसले, राजेश भोसले असे कसलेले कलाकारही आहेत. 


आजच्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात जुन्या काळाची आठवण करून देणारा हा चित्रपट आहे. "चिठ्ठी"मध्ये असलेली भावनिक गुंतवणूक, प्रेमाचा ओलावा, "चिठ्ठी"विषयी असलेली हुरहुर हा सगळा अनुभव या चित्रपट देतो. काही क्षण का होईना कॉलेजच्या, प्रेमाच्या आठवणी ताज्या होतात अशी भावना प्रेक्षकांनी व्यक्त केली. 


"चिट्ठी" चित्रपटात एक धमाल प्रेमकथा पाहायला मिळते आहे. एका तरूणाने त्याच्या प्रेयसीला पाठवलेली "चिठ्ठी" तिला मिळतच नाही आणि त्यानंतर काय गोंधळ होतो, या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे.चिठ्ठी हा चित्रपट म्हणजे ९०च्या दशकातल्या वातावरणाचं नेमकं चित्रण आहे. या चित्रपटानं तरूणाई नक्कीच नॉस्टेल्जिक होईल. साधं आणि मनोरंजक असं हे कथानक आहे

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत नंदिता वहिनीची भूमिका धनश्री काडगांवकरने साकारली आहे.या मालिकेमुळे धनश्री काडगांवकरला चांगलीच लोकप्रियता मिळाल्याचे आपल्याला पाहायाला मिळतंय. मालिकेत तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनेही रसिकांचे मनं जिंकली आहेत.  

Web Title: 'Chitthi' emerges with favorite favorites of the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.