फोर्ब्सच्या ३० अंडर ३० मध्ये आलोक राजवाडेची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2017 05:34 AM2017-02-07T05:34:34+5:302017-02-07T11:04:34+5:30

आपल्या अभिनयाने अभिनेता आलोक राजवाडे याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आलोकच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या कलाकाराचे ...

The choice of Alok Rajwadi in Forbes 30 Under 30 | फोर्ब्सच्या ३० अंडर ३० मध्ये आलोक राजवाडेची निवड

फोर्ब्सच्या ३० अंडर ३० मध्ये आलोक राजवाडेची निवड

googlenewsNext
ल्या अभिनयाने अभिनेता आलोक राजवाडे याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आलोकच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या कलाकाराचे नाव फोर्ब्स इंडियाच्या यादीमध्ये झळकले आहे. फोर्ब्स इंडिया मासिकाने प्रसिद्ध केलेल्या आशिया खंडाच्या यादीमध्ये अभिनेता आलोक राजवाडे हे नाव आहे. फोर्ब्स इंडिया थर्टी अंडर थर्टी अंतर्गत फॅशन, तंत्रज्ञान, व्यापार, उद्योग, चित्रपट, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या युवांपैकी आश्वासक ३० युवक-युवतींना या विशेष यादीमध्ये स्थान दिले असून त्यामध्ये अभिनेता आलोक राजवाडे याचे नाव आहे. 
       
         यविषयी आलोक लोकमत सीएनएक्सला सांगतो, फोर्ब्स मासिकाच्या ३० अंडर ३० या प्रतिष्ठेच्या यादीमध्ये माझा समावेश करण्यात आला आहे.  माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. आत्तापर्यंतच्या माझ्या नाट्यक्षेत्रातील कामाची दखल घेत व अनेक मान्यवरांचा सल्ला घेऊन माझी या यादीमध्ये निवड करण्यात आली आहे. लहानपणापासूनच मला नाटकाची आवड होती. मी अनेकांच्या नकलाही करायचो. ९ वीत असताना मी माझ्या आयुष्यातील पहिलं नाटक केलं व तेव्हापासून माझ्या नाट्यक्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे महाविद्यालयीन जीवनात नाट्यक्षेत्रातील प्रवास अधिक समृद्ध होत गेला. एका टप्प्यावर मोहित टाकळकर, अतुल पेठे, अतुल कुमार यांसारखी नाटकाकडे गांर्भियाने व नाटकाला आपले आयुष्य समजणाºया दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर नाटकाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला.तो अधिक व्यापक व सर्वसमावेशक होत गेला. सुरुवातीला मी कथा प्रधान नाटके बसवली मात्र धर्मकिर्ती सुमंत सारख्या मानसाशी भेट झाली. त्याचं लिखान नेहमीच मला प्रेरित केलं आहे. धर्मकिर्ती हा जगाचा आवाज ऐकणारा लेखक आहे. त्याने लिहिलेली नाटके दिग्दर्शित करताना जगण्याचा प्रवाहं जाणवला. इतिहासाकडे मी नेहमीच आकर्षित झालो आहे. जुन्या इतिहासाला आजच्या चष्म्यातून भिडणं मला गरजेचं वाटतं. आणि यातूनच मी गालिब, शिव चरित्र आणि एक, सिंधु सुधाकर रम आणि इतर अश्या इतिहासातील पात्रांशी व कथेशी आजच्या वास्तवाशी जोडणाºया नाटकांचं मी दिग्दर्शन केलं. 
         
              आलोक नेहमीच नाटक, चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनं जिंकत आहे. त्याने रमा माधव या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाचे चुणूक दाखविली आहे. त्याने नेहमीच आपल्या अभिनयाने रंगभूमीवर प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. 

Web Title: The choice of Alok Rajwadi in Forbes 30 Under 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.