चार कवी एकत्रित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2017 12:53 PM2017-01-02T12:53:46+5:302017-01-02T13:19:19+5:30

मंदार चोळकर, प्राजक्त देशमुख, समीर सामंत आणि तेजस रानडे या आजच्या तरुण पिढीतल्या चार वेगवेगळ्या बाजाचे कवी स्वत:चे नाद ...

Collect four poets | चार कवी एकत्रित

चार कवी एकत्रित

googlenewsNext
दार चोळकर, प्राजक्त देशमुख, समीर सामंत आणि तेजस रानडे या आजच्या तरुण पिढीतल्या चार वेगवेगळ्या बाजाचे कवी स्वत:चे नाद गंध रुप ढंग घेऊन रसिकांना अविस्मरणीय काव्यानुभवाची सफर घडवण्यास येत आहेत.शब्द जुळले म्हणजे कविता येत नाही, आणि कविताला शब्दांनी बांधता देखील येत नाही. त्यासाठी लागतात काव्यात्मक विचार... ! आणि हे विचार जर चार कवींचे असतील तर त्यातून फुलणाºया कवितांना सुगंध तर येणारच! अशा या काव्यात्मक सुंगंधात रंगून जाण्याची नामी संधी नववर्षांच्या निमित्ताने श्रोत्यांना लाभली आहे. समीर सामंत आणि मंदार चोळकर या दोन कवींनी मराठी सिनेसृष्टीला अनेक चांगली गीते दिली आहेत. 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील 'यार  ईलाही', 'दिल कि तपीश, 'अरुणी किराणी' अशी उत्कृष्ट गीते समीर सामंत यांनी दिली. 'देवा तुज्या गाभाºयाला' हे दुनियादारी सिनेमातलं गाणं असो किंवा 'नात्याला काही नाव नसावे' हे मितवा सिनेमातलं गाणं असो मंदार चोळकर यांच्या प्रत्येक गीतांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. २०११ साली या चार कवींना एकत्र आणत निमार्ते सुजित शिंदे यांनी एक अविस्मरणीय काव्यानुभव  we -चार  रसिकांसमोर सादर केला. विशेष म्हणजे या 'we -चार' ला मान्यवरांची दाद आणि श्रोत्यांच्या उदंड प्रतिसाददेखील लाभला असल्यामुळे, आगामी वर्षाच्या सुरुवातीलादेखील हा प्रयोग नव्याने सादर करण्याच्या उद्देशाने हे चार विचारी कवी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. शायरी, कविता,काव्य आणि गीत अशा या we-चारांची मैफल श्रोत्यांसाठी नववर्षाचा सुरेल भेट ठरली असणार हे मात्र नक्की. 

Web Title: Collect four poets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.