कॉमेडीची त्रिमुर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2016 07:47 AM2016-09-23T07:47:40+5:302016-09-27T10:43:50+5:30

मराठी इंडस्ट्रीमध्ये कॉमेडी करणाऱ्या कलाकारांची सध्या चलती आहे. चित्रपटातील हिरोप्रमाणेच कॉमेडी कलाकारदेखील प्रेक्षकांच्या मनावर भाव खाऊन जात आहेत. असेच काही ...

Comedy Trimurti | कॉमेडीची त्रिमुर्ती

कॉमेडीची त्रिमुर्ती

googlenewsNext
ाठी इंडस्ट्रीमध्ये कॉमेडी करणाऱ्या कलाकारांची सध्या चलती आहे. चित्रपटातील हिरोप्रमाणेच कॉमेडी कलाकारदेखील प्रेक्षकांच्या मनावर भाव खाऊन जात आहेत. असेच काही प्रेक्षकांना खळखळून हसविणारे कलाकार प्रेक्षकामध्ये हिट असल्याचे दिसून येत आहे. आता हेच पाहा ना, अभिनेता  सागर कारंडे, भाऊ कदम आणि भारत गणेशपुरे या विनोदी त्रिमुर्तीचा फोटो सध्या सोशलमीडियावर व्हायरल झाला आहे. या कॉमेडी त्रिमुर्तींचा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. चाहत्यांपैकी एकाने तर थेट अमर, अकबर, अन्थोनी म्हणत या त्रिमुर्तींचे कौतुक केले आहे. तसेच या फोटोमध्ये हे तीन ही कलाकार एकदम झक्कास दिसत आहे. नेहमी कॉमेडी लूकमध्ये दिसणारे हे तीन कलाकार फोटोमध्ये मात्र डोळयावर गॉगल, जीन्स, टी-शर्टमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहेत.



 

Web Title: Comedy Trimurti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.