नेहा पेंडसेने स्विम सुटमधील एक जुना फोटो शेअर करताच युजर्सने दिल्या अशा कमेंटस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 16:59 IST2019-01-28T16:54:05+5:302019-01-28T16:59:04+5:30
नेहा सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करत असते.

नेहा पेंडसेने स्विम सुटमधील एक जुना फोटो शेअर करताच युजर्सने दिल्या अशा कमेंटस
मध्यंतरीच्या काळात ती रियालिटी शो बिग बॉसमध्ये बिझी होती. त्यामुळे आता नेहाच्या फॅन्सना तिने लवकरात लवकर रुपेरी पडद्यावर यावे अशी इच्छा आहे. नेहा सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करत असते. नुकतंच नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील तिचा नवा अवतार तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत.ज्यामध्ये ती स्विमिंग पूलच्या काठावर पिंक कलरची बिकनी घातलेली दिसत आहे.
फोटोसोबत जुन्या आठवणी शेयर करत नेहाने आपल्या ट्रांसफॉर्मेशनविषयीही सांगितले आहे. नेहाने फोटोसोबत लिहिले, ''या फोटोमध्ये मी जशी दिसत आहे, आता मी त्यापेक्षा 12 किलो वजन कमी केले आहे. पण मला आश्चर्य वाटते की, तशी मी कोणत्याही साइजमध्ये राहिले तरी माझे स्वतःवर खूप प्रेम आहे'.
नेहा ही फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. तिच्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर बराच काळ चर्चा होती. या व्हिडीओने तिच्या फॅन्सना आणि सोशल मीडियावर साऱ्यांनाच अक्षरक्षा वेड लावलं होतं. या व्हिडीओत ती वर्कआऊट करत असल्याचे पाहायला मिळत होते. वर्कआऊट करुन इतरांनाही त्याचे फायदे कळावेत यासाठी तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तिच्या या व्हिडीओला बऱ्याच कमेंट्स आणि लाईक्सही मिळाल्या होत्या. तिच्या या व्हिडीओपासून अनेकांना वर्कआऊटची प्रेरणा मिळाली असेल आणि तेही फिटनेसबाबत सजग झाले असतील.